ICC Men's Test Batting Rankings - भारत-बांगलादेश यांच्यात आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली १ धावेवर माघारी परतला. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज कसोटी व वन डे क्रमवारी जाहीर केली. ऑस्ट्रेलियाचा कसोटी फलंदाज मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) याने अव्वल स्थानावरील पकड मजबूत करताना विराटशी बरोबरी केली. आयसीसीने ट्विट करून लाबुशेनला शाब्बासकी दिली. त्याने मागील आठवड्यात इंग्लंडच्या जो रूटला मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले होते.
कसला भारी चेंडू टाकला, विराट कोहलीला नाही समजला; बाद झाल्यावर गोलंदाजाकडे पाहत राहिला, Video
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत लाबुशेनने ५०२ धावा चोपल्या. २८ वर्षीय लाबुशेनने एडिलेड कसोटीच्या पहिल्या डावात १६३ धावांची खेळी केली आणि त्या जोरावर त्याने विराट कोहलीच्या कारकीर्दितील सर्वोत्तम ९३७ रेटींग गुणांशी बरोबरी केली. लाबुशेन आता सर्वाधिक रेटींग गुण असलेल्या फलंदाजांमध्ये ११ व्या क्रमांकावर आला आहे. सर डॉन ब्रॅडमन ( ९६१), स्टीव्ह स्मिथ ( ९४७) आणि रिकी पाँटिंग ( ९४२) हे तीन ऑस्ट्रेलियन लाबुशेनच्या पुढे आहेत.
वेस्ट इंडिजचे गॅर सोबर्स, क्लाइड वॅलकॉट आणि व्हीव्ह रिचर्ड यांच्यासह श्रीलंकाचा कुमार संगकारा ९३८ रेटींग गुणांसह लाबुशेनच्या पुढे आहेत. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हीस हेड यानेही कसोटी क्रमवारीत ७७४ रेटींग गुणांसह सात स्थान वर झेप घेताना सहावा क्रमांक पटकावला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत हेडने शतक झळकावे होते. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनही मोठी भरारी घेतली आहे. हॅरी ब्रूक १५ स्थान वर सरकला आहे आणि तो ५५व्या क्रमांकावर आला आहे. मुलतान कसोटीत तो प्लेअर ऑफ दी मॅच होता. गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानावर आहे
वन डे क्रिकेटमध्ये विराट कोहली हा फलंदाजांत सर्वाधिक रेटींग गुण असलेला भारतीय फलंदाज आहे. तो दोन स्थानांच्या सुधारणेसह आठव्या क्रमांकावर आला आहे. द्विशतकवीर इशान किशन याही ३७व्या क्रमांकावर आला आहे. तो १००व्या स्थानावर होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"