कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगही 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे आणि परिस्थिती न सुधारल्यास ती रद्दही केली जाऊ शकते. सध्याची परिस्थितीवरून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा घ्यावी की नाही, यावरही चर्चा सुरू आहे. त्यात आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्पर्धेबाबतही संभ्रम निर्माण झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. त्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या महिलांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस न ठेवल्यामुळे बरीच टीका झाली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. पण, गटातील सरस कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाला अंतिम फेरीचं तिकीट देण्यात आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस न ठेवल्यानं चौफेर टीका झाली. ही चूक सुधारण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या पुरुषांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात यावा, यासाठी आयसीसीसमोर प्रस्ताव ठेवणार आहे.
18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत राखीव दिवस ठेवण्यात यावा असा प्रस्ताव क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार आहे. जून-जुलै महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी यांच्यात एक बैठक होणार आहे. त्यात हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केव्हीन रॉबर्ट म्हणाले,''पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात राखीव दिवस असावा, असा पर्याय अनेकांनी सूचवला आहे.''
सध्याच्या वेळापत्रकानुसार उपांत्य फेरीचे सामने 11 व 12 नोव्हेंबरला होणार आहेत. त्यानंतर 15 नोव्हेंबरला अंतिम सामना होईल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार डेव्हिड वॉर्नरची लीगमधून माघार
'मोदीजी आपकी लिडरशीप काफी विस्फोटक है!', इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं ट्विट अन्...
OMG : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळलेला क्रिकेटपटू Corona पॉझिटीव्ह
Video : 'ती' सेल्फी घेण्यासाठी धावत आली अन् विराट कोहलीनं केलं असं काही
Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा