ICC Men's T20 World Cup Indian squad : Deadline संपली, टीम इंडियाच्या ताफ्यात झालाय का बदल?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Team india make a change in World Cup Squad ? हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहेतच. त्यामुळे त्याच्या जागी शार्दूल ठाकूर याला मुख्य संघात घेतलं जाईल, अशी चर्चा होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:52 PM2021-10-10T19:52:11+5:302021-10-10T19:54:25+5:30

whatsapp join usJoin us
ICC Men's T20 World Cup : Deadline is over, no change in Team India World cup Squad, Sri Lanka and Pakistan make a changes | ICC Men's T20 World Cup Indian squad : Deadline संपली, टीम इंडियाच्या ताफ्यात झालाय का बदल?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

ICC Men's T20 World Cup Indian squad : Deadline संपली, टीम इंडियाच्या ताफ्यात झालाय का बदल?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men's T20 World Cup : पाच वर्षांनंतर होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. १७ ऑक्टोबरपासून या मेगा इव्हेंटला सुरूवात होणार आहे. टीम इंडिया यंदा जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांच्यासाठी भावनिक किनारही आहे. या वर्ल्ड कपनंतर विराट कोहली ( Virat Kohli) टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार नाही. त्यामुळे विराटला जेतेपदानं निरोप देण्याचा सहकाऱ्यांना निर्धार असेल. पण, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील काही खेळाडूंचा आयपीएलमधील फॉर्म हा बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरतोय आणि त्यामुळे १० ऑक्टोबरच्या डेडलाईन संघात बदल केले जातील असे संकेत होते. 

जाणून घेऊयात आज काय घडले... 

  • आज अफगाणिस्ताननं त्यांचा संघ जाहीर केला, तर श्रीलंकेनं त्यांच्या आधी जाहीर केलेल्या संघात चार बदल केले. पाकिस्ताननंही चार बदल केले.
  • अफगाणिस्तान - राशिद खान, रहमनुल्लाह गुर्बाझ, हझरतुल्लाह झजाई, उस्मान घनी, अस्घर अफघान, मोहम्मद नबी, नजिबुल्लाह झाद्रान, हसमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शाहजाद, मुजीब उर रहमान, करिम जनत, गुलबदील नायब, नवीन उल हक, हमीद हसन, शराफुद्दीन अश्रफ, दवलत झाद्रान, शपूर झाद्रान, क्वैस अहमद; राखीव खेळाडू - अफसर झजाई, फारीद अहमद मलिक  

  • श्रीलंकेनं संघात लाहिरू कुमारा, पथूम निसांका, अकिला धनंजया आणि बिनुरा फर्नांडो यांची निवड केली आहे. त्यांनी कामिंदू मेंडीस, नुवान प्रदीप, प्रविण जयाविक्रमा आणि लाहिरी मदुसंका यांना डच्चू दिला. 
  • श्रीलंका - दासून शनाका, कुसल परेरा, दीनेश चंडीमल, धनंजया डी सिल्व्हा, पाथूम निसंका, चरिथ असालंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, चमिका करुणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारा, महिष थिक्षणा, अकिला धनंजया, बिनुरा फर्नांडो 

  • पाकिस्ताननं आझम खान, मोहम्मद सनैन व खुशदाल शाह यांना वगळून त्यांच्या जागी सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान यांना संधी दिली.  सोहैब मक्सूद यानं दुखापतीमुळे माघार घेतली. नॅशनल ट्वेंटी-२० कप स्पर्धेत त्याला दुखापत झाली होती. त्याच्या जागी आता शोएब मलिक ( Shoaib Malik) याची निवड करण्यात आली आहे.
  • पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, शाहिन शाह आफ्रिदी, सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान 

हार्दिक पांड्याला न धड गोलंदाजी करता येतेय ना फलंदाजी... त्याच्या तंदुरुस्तीवर  प्रश्नचिन्ह आहेतच. त्यामुळे त्याच्या जागी शार्दूल ठाकूर याला मुख्य संघात घेतलं जाईल, अशी चर्चा होती. त्यात वरुण चक्रवर्थीही तंदुरुस्त नसल्याच्या चर्चा समोर आल्यानं आयपीएलमध्ये फॉर्मात असलेल्या युझवेंद्र चहलला एन्ट्री मिळेल, अशी आशा होती. सूर्यकुमार यादव व इशान किशन यांनी मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी करून फॉर्म परत मिळवला आहे. भुवनेश्वर कुमारचीही कामगिरी उल्लेखनीय झालेली नाही. तरीही बीसीसीआयनं हाच संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयनं याबाबद अद्याप घोषणा केली नाही, परंतु आयसीसीनं ट्विट केलेल्या सहभागी संघांच्या यादीत भारतीय संघात कोणताच बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे बीसीसीआय आधी जाहीर केलेला संघ घेऊनच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उतरणार आहे. 

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर

Web Title: ICC Men's T20 World Cup : Deadline is over, no change in Team India World cup Squad, Sri Lanka and Pakistan make a changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.