ICC Men's T20 World Cup Qualifier : झिम्बाब्वे व नेदरलँड्स संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; चुरशीच्या लढतीत मिळवला विजय

ICC Men's T20 World Cup Qualifier : झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 08:20 PM2022-07-15T20:20:41+5:302022-07-15T20:27:46+5:30

whatsapp join usJoin us
ICC Men's T20 World Cup Qualifier : Zimbabwe and Netherlands qualified for the 2022 T20 World Cup, they beat Paua new Guinea and USA respectively in Semi finals  | ICC Men's T20 World Cup Qualifier : झिम्बाब्वे व नेदरलँड्स संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; चुरशीच्या लढतीत मिळवला विजय

ICC Men's T20 World Cup Qualifier : झिम्बाब्वे व नेदरलँड्स संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; चुरशीच्या लढतीत मिळवला विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men's T20 World Cup Qualifier : झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे. नेदरलँड्सने उपांत्य फेरीत अमेरिकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवताना आपले तिकीट पक्के केले. बॅसे डे लीडच्या ९१ धावा व २ विकेट्स या अष्टपैलू कामगिरीने नेदरलँड्सला हा विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने २७ धावांनी पापुआ न्यू गिनीला पराभव मानण्यास भाग पाडले. २०१२नंतर प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकही नवा संघ दिसणार नाही. 

आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झिम्बाब्वे विरुद्ध पापुआ न्यू गिनी आणि अमेरिका विरुद्ध नेदरलंड्स असा सामना रंगला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. झिम्बाब्वेच्या विस्ली मॅधेव्हेरेने २९ चेंडूंत ४२ धावा केल्या. रेगिस चकाब्वा ( ३०), कर्णधार क्रेग एर्व्हिन ( ३८), सिकंदर रजा ( २२), सीन विलियम्स ( २२), मिल्टन  शुम्बा ( २९*) आणि रायन  बर्ल ( १०*) यांनी दमदार खेळ केला. पापुआ न्यू गिनीच्या सेसे बाऊ ( २-३२) व चार्ल्स आमिनी ( २-२८) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजानी शरणागती पत्करली. चार्लस आमिनीने ३१ आणि टोनी उराने ६६ धावा करून संघासाठी संघर्ष केला. पण, झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांना ८ बाद १७२ धावाच करता आल्या आणि झिम्बाब्वेने २७ धावांनी हा सामना जिंकला.

दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने उत्तम गोलंदाजी करताना अमेरिकेचा संघ १९.४ षटकांत १३८ धावांवर गुंडाळला. बॅस डे लीड ( २-२०) व पॉल व्हॅन मिकेरेन ( २-२२) यांनी दोन विकेट्स घेतल्या. अमेरिकेकडून स्टीव्हन टेलर ( २६), कर्णधार मोनांक पटेल ( ३२) व निसर्ग पटेल ( २८) यांनी चांगली फलंदाजी केली. उर्वरित फलंदाजांनी निराश केले. अमेरिकेच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचे सलामीवीर स्टीफन मायबर्घ ( ०) व मॅक्स ओ'डाऊड ( १६) हे झटपट माघारी परतले. टॉम कूपरही ३ धावांवर बाद झाला. पण, बॅस डे लीडने अर्धशतक झळकावून संघाचा विजय साकारला आणि त्याला कर्णधार स्कॉट एडवर्ड्सची उत्तम साथ मिळाली. लीडने ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा केल्या, तर एडवर्ड्स २६ धावांवर नाबाद राहिला. नेदरलँड्सने १९ षटकांत ३ बाद १३९ धावा करून विजय पक्का केला. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२चे वेळापत्रक ( T20 World Cup 2022 schedule )
 

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या Super 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. ओमान ( फेब्रुवारी) आणि झिम्बाब्वे ( जून व जुलै) येथे दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत आणि त्यातून संघ  पहिल्या राऊंडमध्ये Super 12मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील.

फर्स्ट राऊंड
१६ ऑक्टोबर  - श्रीलंका विरुद्ध नामिबिया आणि संयुक्त अरब अमिराती  २ विरुद्ध क्वालिफायर ३
१७ ऑक्टोबर - वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड आणि क्वालिफायर १ विरुद्ध आयर्लंड
१८ ऑक्टोबर - नामिबिया विरुद्ध क्वालिफायर ३ आणि श्रीलंका विरुद्ध संयुक्त अरब अमिराती 
१९ ऑक्टोबर - स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर १
२० ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर ३ आणि नामिबिया विरुद्ध संयुक्त अरब अमिराती
२१ ऑक्टोबर - वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड आणि स्कॉटलंड विरुद्ध क्वालिफायर १
 

Web Title: ICC Men's T20 World Cup Qualifier : Zimbabwe and Netherlands qualified for the 2022 T20 World Cup, they beat Paua new Guinea and USA respectively in Semi finals 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.