Virat Kohli : कर्णधारपद सोडलं, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली अन् आता विराट कोहलीच्या मागे साडेसाती लागली!

Virat Kohli failed again : २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उपविजेतेपद, २०१९च्या वन डे वर्ल्ड कपची उपांत्य फेरी आणि  २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेतेपद, अशी आयसीसी स्पर्धांमधील विराटची कामगिरी.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:03 PM2021-11-10T15:03:49+5:302021-11-10T15:04:36+5:30

whatsapp join usJoin us
ICC men's T20I rankings: Virat Kohli drops to eighth spot, KL Rahul jumps to fifth in batting charts | Virat Kohli : कर्णधारपद सोडलं, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली अन् आता विराट कोहलीच्या मागे साडेसाती लागली!

Virat Kohli : कर्णधारपद सोडलं, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली अन् आता विराट कोहलीच्या मागे साडेसाती लागली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय ट्वेंटी-२० संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही. मागील सहा महिन्यांपासून बायो बबलमध्ये असल्याकारणानं त्यानं १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खांद्यावर सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून अखेरच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट जेतेपदाचा दुष्काळ संपवेल, असे वाटले होते. पण, प्रत्यक्षात टीम इंडियाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आता ना कर्णधारपद, ना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे जेतेपद... त्यात विराटनं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून घेतलीय विश्रांती. या सर्व गोष्टींचा विराटला मोठा फटका बसला आहे. 

कर्णधार म्हणून अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराटला अपयश आलं. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उपविजेतेपद, २०१९च्या वन डे वर्ल्ड कपची उपांत्य फेरी आणि  २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेतेपद, अशी आयसीसी स्पर्धांमधील विराटची कामगिरी. त्यामुळे यंदातरी हा दुष्काळ संपेल असे वाटले होते, परंतु पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवला अन् टीम इंडियाच्या दृढनिश्चयाचा चुराडा झाला. न्यूझीलंडनंही ८ विकेट्स राखून भारताचे आव्हान साखळीतच गुंडाळले. त्यानंतर अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया या तुलनेनं दुबळ्या संघावर त्यांनी मात केली, परंतु त्याचा खास फायदा झाला नाही. फलंदाजीचं म्हणाल तर विराटनं पाकिस्तानविरुद्ध ५७ धावा केल्या आणि त्यानंतर त्याला संधी मिळाली ती स्कॉटलंडविरुद्ध... 

ICC T20I rankings मध्ये विराटची घसरण
आयसीसीनं आज जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत फलंदाजांमध्ये विराट कोहलीला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा अव्वल स्थानावर कायम आहे आणि इंग्लंडचा डेविड मलान दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले असले तरी त्यांचा फलंदाज एडन मार्कराम यानं जोरदार मुसंडी मारली आहे. त्यानं तीन क्रमांकाच्या सुधारणेसह थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मार्करामनं २५ चेंडूंत ५२ धावा कुटल्या होत्या.  भारताच्या लोकेश राहुलनंही ( KL Rahul) वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार फलंदाजी केली आणि त्याचा फायदा म्हणून तोही ८व्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर आला. पण, माजी कर्णधार विराट चौथ्या क्रमांकावरून थेट ८व्या स्थानी फेकला गेला.  

Web Title: ICC men's T20I rankings: Virat Kohli drops to eighth spot, KL Rahul jumps to fifth in batting charts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.