ICC Test Ranking : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी, कसोटी सलामीवीर म्हणून दोन वर्षांत घेतली गरूड भरारी!

ICC Men's Test Player Rankings : टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या २७२ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १२० धावांत तंबूत परतला अन् भारतानं १५१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 01:56 PM2021-08-18T13:56:52+5:302021-08-18T14:08:05+5:30

whatsapp join usJoin us
ICC Men's Test Player Rankings : Rohit Sharma achieves the career best Test rating of 773, Jasprit Bumrah slip in 10th position | ICC Test Ranking : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी, कसोटी सलामीवीर म्हणून दोन वर्षांत घेतली गरूड भरारी!

ICC Test Ranking : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी, कसोटी सलामीवीर म्हणून दोन वर्षांत घेतली गरूड भरारी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men's Test Player Rankings : टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या २७२ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १२० धावांत तंबूत परतला अन् भारतानं १५१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.  लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी कसोटी फलंदाजांमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma) यानं गरूड भरारी घेतली. दोन वर्षांपूर्वी रोहित शर्माला कसोसटीत सलामीवीर म्हणून खेळवण्यात आलं आणि आज जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत त्यानं कारकिर्दीतील मोठा पराक्रम केला. दोन वर्षांपूर्वी कसोटी क्रमवारीत ५४व्या क्रमांकावर असलेल्या रोहितनं आज ६वा क्रमांक पटकावताना कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग पटकावली.

अजिंक्य रहाणेचा ट्रोलर्सवर पलटवार; टीम इंडियाच्या संयमी फलंदाजाची पोस्ट व्हायरल

आयसीसीनं बुधवारी जाहीर केलल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार जो रूट दोन स्थान वर सरकला असून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( ९०१) अव्वल क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ७७६ गुणांसह पाचव्या, रोहित ७७३ गुणांसह सहाव्या आणि रिषभ पंत ७३६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. सलामीवीर म्हणून सर्वाधिक गुण कमावणारा रोहित हा अव्वल फलंदाज ठरला. शतकवीर लोकेश राहुलनंही २० क्रमांकानी वर सरकत ३७व्या स्थानी पोहोचला. ( Rohit Sharma was 54th in ICC Test rankings when he becomes the opener and two years later, he is 6th, achieved his highest ever rating and highest-ranked opener as well in the world.)


गोलंदाजांमध्ये आर अश्विन ८४८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. जसप्रीत बुमराहची मात्र १०व्या स्थानी घसरण झाली आहे. लॉर्ड्सवर ८ विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजनंही कारकिर्दीतील सर्वोत्तम ४६५ गुणांसह ३८ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. इशांत शर्मानं १८ गुणांची कमाई केली, तर जसप्रीत बुमराहला ६ गुणांचा फटका बसला. 

Web Title: ICC Men's Test Player Rankings : Rohit Sharma achieves the career best Test rating of 773, Jasprit Bumrah slip in 10th position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.