ICC Men's Test Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या २०२२ मधील सर्वोत्तम कसोटी संघात भारताच्या एकमेव खेळाडूने स्थान पटकावले आहे. अपघातामुळे रिषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेला आहे आणि पुढील ६-८ महिने त्याच्या पुनरागमनाची शक्यता कमीच आहे. अशात आयसीसीच्या घोषणेने रिषभच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उस्मान ख्वाजा ( ऑस्ट्रेलिया ) - उस्मान ख्वाजाचे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन करताना इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही डावांत शतके ठोकली. त्याने पहिल्या डावात शानदार १३७ आणि दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावा केल्या. डावखुऱ्या फलंदाजाने पाकिस्तान दौऱ्यावर ४९६ धावा केल्या आणि दोन शतकं झळकावली. त्याने २०२२मध्ये १०८० धावा केल्या.
क्रेग ब्रॅथवेट ( वेस्ट इंडिज) - वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि सलामीवीराने १४ डावांत 62.45 च्या सरासरीने 687 धावा केल्या.
बाबर आझम ( पाकिस्तान) - पाकिस्तानचा कसोटी कर्णधार २०२२ मध्ये सातत्याने फलंदाजी केली. त्याने कॅलेंडर वर्षात चार शतके आणि आणखी सात अर्धशतके केली. नऊ सामन्यांमध्ये त्याने 69.94 च्या सरासरीने विलक्षण 1184 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहुप्रतीक्षित घरच्या मालिकेत बाबरने घरच्या परिस्थितीत 390 धावा केल्या आणि वर्षाच्या उत्तरार्धात इंग्लंडला भेट दिली तेव्हा त्याने आणखी 348 धावा केल्या.
जॉनी बेअरस्टो ( इंग्लंड) - इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षाचा आनंद लुटला. त्याने वर्षाची सुरुवात सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकाने केली आणि वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिल्या डावात त्याने शानदार 140 धावांची खेळी केली. बेअरस्टोने सलग १३६, १६२, ७१*, १०६ आणि ११४* धावा केल्या.
रिषभ पंत ( भारत ) - भारताच्या यष्टिरक्षक-फलंदाजाने बॅटने आणखी एक आश्चर्यकारक वर्षाचा आनंद लुटला. त्याने 12 डावांत 61.81 च्या सरासरीने आणि 90.90 च्या स्ट्राइक रेटने 680 धावा केल्या. ग्लोव्हजसह त्याने सहा स्टंपिंग केले आणि 23 झेल घेतले.
पॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया) - ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधाराने 2022 च्या अखेरीस जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपल्या संघाचे नेतृत्व केले. त्याने 2022 मध्ये एकूण 10 सामन्यांमध्ये केवळ 21.83 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या.
कागिसो रबाडा ( दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने 2022 मध्ये नऊ सामन्यांत 47 विकेट घेतल्या.
नॅथन लिऑन ( ऑस्ट्रेलिया) - ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फिरकीपटूने 2022 मध्ये 11 कसोटींमध्ये 29.06 च्या सरासरीने 47 विकेट्स घेतल्या. घरच्या मैदानावर त्याने 21.33 च्या सरासरीने 24 विकेट घेत विशेष प्रभाव पाडला.
जेम्स अँडरसन ( इंग्लंड) - इंग्लंडचा अनुभवी स्विंग गोलंदाजाने जागतिक दर्जाची कामगिरी केली. ४० वर्षीय गोलंदाजाने 19.8 च्या सरासरीने आणि 2.42 च्या इकॉनॉमीने 36 बळी घेतले.