IND vs SA: पराभव होताच आफ्रिकेचे खेळाडू रडले; भारतीय शिलेदारांनी दिला धीर

IND vs SA, U19 World Cup: भारताच्या युवा ब्रिगेडने उपांत्य सामन्यात विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:33 PM2024-02-07T14:33:19+5:302024-02-07T14:34:53+5:30

whatsapp join usJoin us
ICC Mens U19 World Cup 2024 South African players emotional after defeat, Indian captain Uday Saharan cheers them on, see here pics | IND vs SA: पराभव होताच आफ्रिकेचे खेळाडू रडले; भारतीय शिलेदारांनी दिला धीर

IND vs SA: पराभव होताच आफ्रिकेचे खेळाडू रडले; भारतीय शिलेदारांनी दिला धीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Mens U19 World Cup 2024: भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा युवा ब्रिगेडने फायनलचे तिकिट मिळवले. दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर सध्या अंडर-१९ विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ५० षटकांच्या या विश्वचषकात भारताने सुरूवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. मंगळवारी भारताच्या युवा ब्रिगेडने यजमानांना नमवून विश्वचषक उंचावण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर आफ्रिकन खेळाडू भावूक झाल्याचे दिसले. अनेकांना अश्रू अनावर झाले.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भावूक होताच भारतीय शिलेदारांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कर्णधार उदय सहारनने आफ्रिकन कर्णधाराला मिठी मारून खेळभावना दाखवली. यजमान संघाचे खेळाडू भावूक झाल्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. मराठमोळ्या सचिन धसने शानदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. मूळचा बीडमधील असलेल्या सचिनने ९६ धावांची अप्रतिम खेळी केली. त्याच्याशिवाय भारतीय कर्णधार उदय सहारनने ८१ धावांची खेळी केली. भारतीय कर्णधाराने १२४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ८१ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

अंडर-१९ विश्वचषक २०२४ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेतील विलोमूर पार्क, बेनोनी इथे उपांत्य सामना पार पडला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान आफ्रिकेच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २४४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४८.५ षटकांत ८ बाद २४८ धावा करून फायनलचे तिकिट मिळवले. सचिन धसने ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९५ चेंडूत ९६ धावांची खेळी केली.

आफ्रिकेने दिलेल्या २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीला ४ मोठे धक्के बसले. आघाडीचे फलंदाज आदर्श सिंग (०), अर्शिन कुलकर्णी (१२), मुशीर खान (४) आणि प्रियांशू मोलिया (५) स्वस्तात माघारी परतले. पण मराठमोळ्या सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांच्यात मोठी भागीदारी झाली. त्यांनी दोघांनी मिळून पाचव्या बळीसाठी १८७ चेंडूत १७१ धावा कुटल्या. आफ्रिकन गोलंदाज बळी घेण्यासाठी तरसताना दिसले. पण, सचिन धसला बाद करून यजमानांनी घरच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. शतकापासून केवळ ४ धावा दूर असताना सचिन बाद झाला अन् भारताला पाचवा झटका बसला. अखेर २ गडी राखून भारताने विजय मिळवत सहाव्यांदा विश्वचषकाच्या फायनलचे तिकिट मिळवले. 

Web Title: ICC Mens U19 World Cup 2024 South African players emotional after defeat, Indian captain Uday Saharan cheers them on, see here pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.