इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे काही परदेशी खेळाडूंना आयपीएलच्या या टप्प्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे सर्व संघ बदली खेळाडू शोधत आहेत. काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( RCB) संघानं तीन बदली खेळाडूंची नावं जाहीर केली होती आणि त्यात आज आणखी एक नाव जोडले गेले आहे. राजस्थान रॉयल्सनंही ( RR) ट्वेंटी-२०तील नंबर वन खेळाडूला आपल्या ताफ्यात घेत अन्य संघांना मोठा धक्का दिला आहे.
स्टार फिरकीपटू राशिद खान याची अफगाणिस्तानात आहे कोट्यवधींची संपत्ती!
जोफ्रा आर्चर आयपीएल खेळणार नसल्यानं RRला मोठा धक्का बसलाच आहे, त्यात बेन स्टोक्सच्या समावेशाबद्दलही अद्याप स्पष्टता नाही. पण, राजस्थान रॉयल्सनं दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तब्रेझ शम्सीला ताफ्यात दाखल करून घेतले आहे. शम्सी हा आयसीसीच्या ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यानं ३९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ४५ विकेट्स घेतल्या आहेत. एकूण १६३ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १८३ विकेट्स आहेत. आफ्रिकेकडून त्यानं २ कसोटी व २७ वन डे सामनेही खेळले आहेत. ( Tabraiz Shamsi joins Rajasthan Royals for IPL 2021.)