ICC rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) जाहीर केलल्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानच्या फलंदाजांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला धक्का दिला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा वन डे फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी कायम असताना सलामीवीर इमाम-उल-हक ( Imam-ul-Haq ) याने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे विराटची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत इमामने सलग तीन अर्धशतकं झळकावली. त्याने या कामगिरीच्या जोरावर मालिकावीराचा किताबही पटकावला. 26 वर्षीय इमामने 20 रेटींग पॉईंटची सुधारणा करताना थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याचे 815 रेटींग पॉईंट झाले आहेत. विराटचे 811 रेटींग पॉईंट आहेत. बाबरच्या खात्यात 892 रेटींग पॉईंट आहेत. रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह ( 679) पाचव्या स्थानी कायम आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने दोन स्थानांची सुधारणा करताना चौथा क्रमांक पटकावला आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये एकही भारतीय खेळाडू टॉप टेनमध्ये नाही.
जो रूट अव्वल..
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट अव्वल फलंदाज बनला आहे. कसोटी फलंदाजांमध्ये त्याने 897 रेटींगसह अव्वल स्थान पटकावताना ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांना मागे ढकलले. रोहित शर्मा व
विराट कोहली अनुक्रमे आठव्या व दहाव्या क्रमांकावर आहेत.
Web Title: ICC ODI batting rankings: Imam-ul-Haq climbs to No.2 in the updated rankings, Virat Kohli slips to No.3, Joe Root reclaims No.1 spot in Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.