Latest ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत अफगाणिस्तानच्या अझमतुल्लाह ओमरझाईनं अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. त्याने आपलाच सहकारी मोहम्मद नबीला मागे टाकत नंबर वनचा ताज पटकवला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरीचा अफगाणिस्तान स्टारला झाला फायदा
ओमरझईच्या खात्यात २९६ रेटिंग पॉइंट्स असून आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंगसह त्याने नवा किर्तीमान प्रस्थापित केला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोहम्मद नबीच्या खात्यात २९२ रेटिंग पाँइंट्स जमा आहेत. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ओमरझाईनं सर्वोच्च कामगिरी करून दाखवली होती. गोलंदाजी करताना ५ विकेट्स आणि फलंदाजी वेळी ४१ धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पावसाने वाया गेलेल्या सामन्यातही ६७ धावांची खेळी केली होती.
अक्षर पटेलचीही उंच उंडी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बॅटिंग बॉलिंग दोन्हीत धमक दाखवणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेललाही क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. ऑलराउंडरच्या गटातून तो १७ स्थांनानी झेप घेत १९४ रेटिंग पॉइंट्ससह १३ व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही अक्षर पटेलची वनडे क्रमवारीतील सर्वोच्च रेटिंग आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ४२ धावांच्या खेळीसह ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने २७ धावांची खेळी केली होती. या दोन्ही सामन्यात त्याने प्रत्येकी एक-एक विकेटही आपल्या खात्यात जमा केली होती. फायनलमध्ये आपल्या अष्टपैलू खेळीतील दबदबा दाखवून त्याला टॉप १० मध्ये एन्ट्री मारण्याची संधी आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत किंग कोहलीनं कॅप्टन रोहित शर्माला दिला शह
फलंदाजांच्या क्रमवारीत शुबमन गिल आपले अव्वलस्थान टिकवून आहे. दुसरीकडे सातत्यपूर्ण दमदार खेळीसह विराट कोहली ७४४ रेटिंगसह चौथ्या स्थानावर पोहचला. किंग कोहलीनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये ९८ चेंडूत ८४ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर त्याने कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माची क्रमवारीत दोन स्थानांनी घसरण झाली असून तो ७४५ रेटिंग पॉइंटसह पाचव्या स्थानावर आहे. भारतीय सलामीवीर शुबमन गिल (७९१), पाकिस्तानचा बाबर आझम (७७०) आणि दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन (७६०) टॉप तीनमध्ये असल्याचे दिसून येते.
गोलंदाजीमध्ये शमीच्या क्रमवारीत सुधारणा
भारतीय संघाच्या ताफ्यातील प्रमुख जलगती गोलंदाज मोहम्मद शमीनं (६०९ रेटिंग पॉइंट्स) गोलंदाजी क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा करत ११ व्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने ४८ धावा खर्ट करून तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. गोलंदाजांच्या क्रमवारीत श्रीलेकंचा महीश तीक्षणा टॉपला आहे.
Web Title: ICC ODI Rankings Azmatullah Omarzai Becomes No 1 ODI All Rounder Virat Kohli Surpasses Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.