नवी दिल्ली : तब्बल ५२ वर्षांनंतर पाकिस्तानी संघाला वन डे क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्यात यश आले होते. पण केवळ ४८ तासांच्या कालावधीनंतर त्यांचीतिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघ दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा करत होता. पण आता आयसीसीने त्यांच्या आनंदावर पाणी टाकल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानचे आयसीसी वन डे क्रमवारीत मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील सुरूवातीचे चार सामने जिंकून पाकिस्तानने ४-१ मालिका आपल्या नावावर केली. पण अखेरच्या सामन्यात पाहुण्या किवी संघाने ४७ धावांनी विजय मिळवला. क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी पाकिस्तानला अखेरचा सामना जिंकणे गरजेचे होते. परंतु पाकिस्तानच्या पराभवामुळे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान गाठले आहे.
ICC वन डे क्रमवारीत पाकिस्तानची घसरण
- पहिला क्रमांक - ऑस्ट्रेलिया, ११३ गुण
- दुसरा क्रमांक - भारत, ११३ गुण
- तिसरा क्रमांक - पाकिस्तान ११२ गुण
पाकिस्तानची मोठी घसरण लक्षणीय बाब म्हणजे कालच्या पराभवानंतर पाकिस्तान आता वन डे क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. त्यांचे एकूण गुण ११३ वरून ११२ असे झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने आता ११३ रेटिंग गुणांसह पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे, तर भारतीय संघ ११३ गुणांसह दुसऱ्या स्थानी स्थित आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"