मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वन डे क्रमवारीत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम राखले आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर या क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेतली आहे. तो 17व्या स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टही सात स्थानांच्या सुधारणेसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बोल्टने भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत सर्वाधिक 12 विकेट घेतल्या आहेत.
धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग तीन अर्धशतकी खेळी केल्या होत्या आणि त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते. धोनी आता 17व्या स्थानावर आला आहे. केदार जाधव आठ स्थानांच्या सुधारणेसह 35 व्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक, हाशिम आमला व रिझा हेंड्रीक्स यांनी अनुक्रमे क्रमवारीत सुधारणा करताना अनुक्रमे 8, 13 आणि 94 व्या स्थानी झेप घेतली आहे.
भारतीय गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल टॉप फाईव्हमध्ये पोहोचला आहे आणि भुवनेश्वर कुमार सहा स्थानांच्या सुधारणेसह 17 व्या स्थानी पाहोचला आहे.
Web Title: ICC ODI Rankings: Virat Kohli, Rohit Sharma maintain No. 1, No. 2 spots; MS Dhoni jumps three positions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.