Join us  

रोहित शर्माकडे ICC च्या सर्वोत्तम वन डे संघाचे नेतृत्व; प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ भारतीय 

ICC ODI team of the year 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) काल २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला आणि आज वन डे संघ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 1:08 PM

Open in App

ICC ODI team of the year 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) काल २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादव याच्याकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आणि त्याच्यासह या संघात यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई व अर्शदीप सिंग यांनी स्थान पटकावले. आज आयसीसीने २०२३ मधील सर्वोत्तम वन डे संघ जाहीर केला आणि त्यात वन डे वर्ल्ड कप फायनल खेळणाऱ्या दोन संघांतील ८ खेळाडूंना स्थान दिले गेले. सर्वोत्तम ११ वन डे खेळाडूंमध्ये भारताच्या ६ जणांचा समावेश असून रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे. 

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप गाजवला... त्याच्या बिनधास्त खेळीने भारताला फआयनलपर्यंत पोहोचवले. रोहितने २०२३ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये ५२च्या सरासरीने १२५५ धावा केल्या. त्याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध १३१ धावांची महत्त्वाची खेळी केली होती. शुबमन गिलसाठी हे वर्ष संस्मरणीय राहिले आहे आणि बीसीसीआयच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूचा यंदाचा पुरस्कारही त्याला मिळणार आहे. त्याने वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध १४९ चेंडूंत २०८ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याने या वर्षात १५८४ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड याने वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये अविस्मरणीय खेळी करून भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. विराट कोहलीसाठी वर्ल्ड कप विश्वविक्रमी ठरले. वन डेत ५० शतकं आणि एकाच पर्वात सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने नोंदवला.  त्याने २०२३ मध्ये वन डेत १३७७ धावा केल्या.

न्यूझीलंडलचा डॅरिल मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा हेनरिच क्लासेन, मार्को यानसेन, ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा यांनीही संघात स्थान पटकावले आहे. भारताचे दोन जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी हेही या संघात आहेत. शिवाय फिरकीपटू कुलदीप यादवही आहे. 

वर्षातील सर्वोत्तम वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरिल मिचेल,  हेनरिच क्लासेन, मार्को यानसेन, अॅडम झम्पा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव. 

टॅग्स :आयसीसीरोहित शर्माविराट कोहलीकुलदीप यादव