ICC ODI World Cup 2023 IND vs BAN : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता दिसू लागली आहे. कारण सामन्याच्या एक दिवस आधी पुण्यात पाऊस पडला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ ऑक्टोबरलाही पाऊस पडण्याची शक्यता आहे का? याबाबत हवमानाचा अंदाज समोर आला आहे.
ईस्ट ऑर वेस्ट विराट कोहली इज बेस्ट! ICC ने दिली आनंदाची बातमी, सर्वांची उडाली झोप
भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत भारतीय संघ १.८२१ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेला काल पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचा नेट रन रेट १.३८५ असा आहे आणि ते ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पाठोपाठ पाकिस्तान ( -०.१३७ ) चौथ्या क्रमांकावर आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यापूर्वी बुधवारी संध्याकाळी मैदानावर काळे ढग दिसत होते आणि हलका पाऊसही पडला. या पावसामुळे बांगलादेशच्या सराव सत्रावरही परिणाम झाला. तर ज्या खेळपट्टीवर हा सामना खेळवला जाणार आहे, ती झाकली गेली आहे. उद्याही ढगाळ वातावरण असणार आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार उद्या काळे ढग दाटून येण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाची आशा फारशी दिसत नाही. १९ ऑक्टोबर रोजी पुण्यात कमाल तापमान ३४अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच ताशी ११ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. जे वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यात मदत करू शकतात.
दोन्ही संघ
बांगलादेश : लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसैन शांतो, मेहिदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद हृदॉय, महेदी हसन, हसन महमूद, तनजीम हसन शाकिब, नसुम अहमद, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
Web Title: ICC ODI World Cup 2023 : A bit of rain in Pune a day before the INDvsBAN match at MCA stadium in Gahunje, check tomorrow weather report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.