ICC ODI World Cup 2023 IND vs BAN : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता दिसू लागली आहे. कारण सामन्याच्या एक दिवस आधी पुण्यात पाऊस पडला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ ऑक्टोबरलाही पाऊस पडण्याची शक्यता आहे का? याबाबत हवमानाचा अंदाज समोर आला आहे.
ईस्ट ऑर वेस्ट विराट कोहली इज बेस्ट! ICC ने दिली आनंदाची बातमी, सर्वांची उडाली झोप
भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत भारतीय संघ १.८२१ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेला काल पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचा नेट रन रेट १.३८५ असा आहे आणि ते ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पाठोपाठ पाकिस्तान ( -०.१३७ ) चौथ्या क्रमांकावर आहेत.
दोन्ही संघ बांगलादेश : लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसैन शांतो, मेहिदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद हृदॉय, महेदी हसन, हसन महमूद, तनजीम हसन शाकिब, नसुम अहमद, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.