BAN vs SL LIVE । नवी दिल्ली : दिल्लीमध्ये होत असलेल्या बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यावरून वाद रंगला आहे. खरं तर श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला 'टाइम आउट'चा फटका बसला अन् त्याला बाद घोषित करण्यात आले. खरं तर मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून फलंदाजीसाठी आला होता. पण चूक लक्षात आल्यानंतर त्याने हेल्मेट बदलले. पण यासाठी वेळ गेला. यादरम्यान बांगलादेशी खेळाडूंनी त्याच्या विकेटसाठी अपील केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापद्धतीने बाद होणारा मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरला आहे. सदीरा समरविक्रमा तंबूत परतल्यानंतर मॅथ्यूज फलंदाजीसाठी आला होता.
तत्पुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने घातक मारा करत श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत धाडला. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बांगलादेशचा संघ बाहेर झाला आहे, तर श्रीलंकेचा संघ अद्याप जिवंत आहे. उपांत्य फेरीचे तिकिट मिळवण्यासाठी श्रीलंकेच्या चाहत्यांना एका चमत्काराची आशा आहे. पण श्रीलंकेने आजचा सामना गमावला तर त्यांचे देखील यंदाच्या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर होत असलेला हा सामना मॅथ्यूजच्या वादग्रस्त विकेटमुळे चर्चेत आला. खरं तर दिल्लीतील वायू प्रदूषण पाहता दोन्हीही संघांनी आपले सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
आजच्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ -
शाकीब अल हसन (कर्णधार), तंजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसैन शांतो, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, तौहीद हृदोय, मेहदी हसन मिराज, तन्झीम हसन शाकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ -
कुसल मेंडिस (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महिश तीक्ष्णा, दुष्मंथा चमीरा, कसून राजिथा, दिलशान मदुशंका.
Web Title: icc odi world cup 2023, ban vs sl Angelo Mathews becomes the first player to be given out on timed out in the history of cricket, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.