ENG vs BAN : १ शतक अन् २ अर्धशतकं! इंग्लंडनं फोडला घाम; बांगलादेशसमोर ३६५ धावांचे तगडे लक्ष्य

icc odi world cup 2023, ENG vs BAN live match : प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:47 PM2023-10-10T14:47:33+5:302023-10-10T14:47:57+5:30

whatsapp join usJoin us
icc odi world cup 2023, ENG vs BAN live match David Malan, Joe Root and Jonny Bairstow's innings helped England set Bangladesh a target of 365 runs to win  | ENG vs BAN : १ शतक अन् २ अर्धशतकं! इंग्लंडनं फोडला घाम; बांगलादेशसमोर ३६५ धावांचे तगडे लक्ष्य

ENG vs BAN : १ शतक अन् २ अर्धशतकं! इंग्लंडनं फोडला घाम; बांगलादेशसमोर ३६५ धावांचे तगडे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ENG vs BAN live : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने बांगलादेशला घाम फोडला. डेव्हिड मलानची शतकी खेळी आणि इंग्लिश संघाची सांघिक खेळी बांगलादेशला महागात पडली. इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३६४ धावा केल्या. सलामीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर गतविजेत्या इंग्लिश संघाने जोरदार पुनरागमन केले. मलानशिवाय जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी अर्धशतक झळकावून इंग्लंडची धावसंख्या ३५० पार नेली. 

दरम्यान, सलामीवीर डेव्हिड मलानने विक्रमी शतक झळकावत भारतीय भूमीवर इतिहास रचला. खरं तर भारतातील विश्वचषकात शतक झळकावणारा तो तिसरा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे सामना खेळवला जात आहे. डेव्हिड मलानने आपल्या वन डे कारकिर्दीतील सहावे शतक झळकावून बांगलादेशसमोर तगडे आव्हान उभारले. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९१ चेंडूत शतक पूर्ण केले. तसेच चालू विश्वचषकात इंग्लिश संघाकडून शतक झळकावणारा तो पहिला शिलेदार ठरला आहे. 

इंग्लंडकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक १४० धावांची खेळी केली, तर जॉनी बेअरस्टो (५२) आणि जो रूटला (८२) धावा करण्यात यश आले. बांगलादेशकडून महेदी हसनने सर्वाधिक चार बळी घेऊन इंग्लिश संघाला कसेबसे ३६४ धावांपर्यंत रोखले. याशिवाय शोरफुल इस्लाम (३) आणि तस्कीन अहमद आणि शाकीब अल हसन यांना १-१ बळी घेता आला. अखेर इंग्लंडला ३६४ धावांवर रोखण्यात बांगलादेशला यश आले. त्यामुळे शाकीब अल हसनच्या संघासमोर विजयासाठी ३६५ धावांचे तगडे आव्हान आहे. गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे बांगलादेशविरूद्धचा सामना इंग्लिश संघासाठी महत्त्वाचा आहे. डेव्हिड मलानने स्फोटक सुरूवात करून दिल्यानंतर सर्वच इंग्लिश फलंदाजांनी हात साफ केले अन् बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभारला. 

Web Title: icc odi world cup 2023, ENG vs BAN live match David Malan, Joe Root and Jonny Bairstow's innings helped England set Bangladesh a target of 365 runs to win 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.