Join us  

IND vs AUS FINAL : 'खेळ' खेळपट्टीचा! IND vs PAK सामन्यातील पिचवर थरार; कोणाला होणार फायदा?

narendra modi stadium pitch report : सलग दहा विजय नोंदवून यजमान भारतीय संघाने मायदेशात ऐतिहासिक कामगिरी केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:41 AM

Open in App

icc odi world cup 2023 final | अहमदाबाद : तब्बल १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात उतरला आहे. सलग दहा विजय नोंदवून यजमान भारतीय संघाने मायदेशात ऐतिहासिक कामगिरी केली. उपांत्य सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करून रोहितसेनेने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर किताबासाठी लढत होत आहे. रविवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा मोठा सामना जगातील सर्वात मोठ्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयसह आयसीसीने जय्यत तयारी केली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडिया पुन्हा एकदा स्लो पिचवर खेळू शकते. माहितीनुसार, विश्वचषकाचा अंतिम सामना त्याच खेळपट्टीवर होणार आहे, जिथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना खेळला गेला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात स्लो पिचवर चेंडू धीम्या गतीने फलंदाजापर्यंत पोहचेल. 

कुलदीप यादव आणि जड्डू चमकणार?भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रशिक्षण सत्रादरम्यान खेळपट्टीचे जवळून निरीक्षण केले. साधारणपणे काळ्या मातीची खेळपट्टी संथ असते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यानही शेजाऱ्यांना १९१ धावांत गुंडाळून टीम इंडियाने हा सामना ७ गडी राखून जिंकला होता. पाकिस्तानविरूद्ध भारतीय फिरकीपटूंची जादू पाहायला मिळाली होती. अंतिम सामन्यात देखील फिरकीपटूंचा बोलबाला राहील असे रिपोर्ट्समधून समोर आले. संथ खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना अधिक मिळते. असे झाल्यास भारताचा चायनामन कुलदीप यादव आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणू शकतात. दरम्यान, पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघात देखील अॅडम झाम्पासारखा स्टार फिरकीपटू आहे, जो भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो. विश्वचषकाचे फायनलिस्ट दोन्हीही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. 

भारताचा सलग दहावा विजयन्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ १९ तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळेल. अर्थात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मोहम्मद शमीने ५७ धावा देत ७ बळी घेतले अन् संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. ३९८ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली. पण, मोहम्मद शमी किवी संघासाठी काळ ठरला अन् त्याने सुरूवातीलाच दोन मोठे झटके दिले. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी नोंदवून भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला. पण, पन्हा एकदा शमी एक्सप्रेसच्या स्विंगने न्यूझीलंडचा संघ चीतपट झाला आणि भारताने ७० धावांनी विजय साकारला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियानरेंद्र मोदी स्टेडियमभारतीय क्रिकेट संघ