Join us  

ODI World Cup 2023 स्पर्धेतील भारताच्या वेळापत्रकातही झाला बदल, दोन सामन्यांच्या तारखा बदलल्या 

ICC ODI world Cup 2023 स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 5:39 PM

Open in App

ICC ODI world Cup 2023  स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आला. १५ ऑक्टोबरला नवरात्रीमुळे सुरक्षा यंत्रणेने भारत-पाकिस्तान यांच्यातला सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली होती. शिवाय २-३ क्रिकेट बोर्डांनीही वेळापत्रकात काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार आज आयसीसीने हे वेळापत्रक जाहीर केले आणि भारत - पाकिस्तान यांच्यासह ९ ८ सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. India vs Pakistan हा सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता, परंतु आता हा सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे. शिवाय भारताचा आणखी एक सामन्याची तारीख बदलली आहे. 

९ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक

  • १० ऑक्टोबर - इंग्लंड वि. बांगलादेश ( १०.३० वा. पासून)
  • १० ऑक्टोबर - पाकिस्तान वि. श्रीलंका ( २ वा. पासून)
  • १२ ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका ( २ वा. पासून) 
  • १३ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. बांगलादेश ( २ वा. पासून)
  • १४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान ( २ वा. पासून)
  • १५ ऑक्टोबर - इंग्लंड वि. अफगाणिस्तान ( २ वा. पासून)
  • ११ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश ( १०.३० वा. पासून)
  • ११ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान ( २ वा.पासून)
  • १२ नोव्हेंबर - भारत वि. नेदरलँड्स ( २ वा. पासून)

 

५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील १० शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या २०१९च्या अंतिम सामन्यातील संघांमध्ये ५ ऑक्टोबरला पहिला सामना होईल. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीशिवाय भारताचा नेदरलँड्स विरुद्धचा सामना ११ नोव्हेंबर ऐवजी १२ नोव्हेंबरला बंगळुरू येथे होणार आहे.

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुधारित वेळापत्रक(  Indian team schedule for World Cup 2023 )

  • ८ ऑक्टोबर - भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
  • ११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्ता, दिल्ली
  • १४ ऑक्टोबर- भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
  • १९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे
  • २२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड, धर्मशाला
  • २९ ऑक्टोबर - भारत वि. इंग्लंड, लखनौ
  • २ नोव्हेंबर - भारत वि. श्रीलंका, मुंबई
  • ५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
  • १२ नोव्हेंबर- भारत वि. नेदरलँड्स, बंगळुरू
टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघभारतरोहित शर्माआयसीसी
Open in App