बंगळुरू : भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघ आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी सामना करत आहे. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून आजच्या सामन्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरूद्धच्या सामन्यानंतर शादाब खानला पाकिस्तानी संघात स्थान मिळाले नाही. आमच्या फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे यावेशी बाबरने नमूद केले. शादाबच्या जागी उसामा मीरला शेजाऱ्यांच्या संघात स्थान मिळाले.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ -बाबर आझम (कर्णधार), इमाम-उल-हक, अब्दुला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.
भारताकडून दारूण पराभवपाकिस्तानी संघाला आपल्या तिसऱ्या सामन्यात यजमान भारतीय संघाकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.