चेन्नई : दहा वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने आज भारतीय संघ आपल्या विश्वचषकातील अभियानाची सुरूवात करत आहे. रोहितसेना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपला सलामीचा सामना खेळत आहे. एक ट्रॉफी आपल्या घरी नेण्यासाठी दहा संघ मैदानात आहेत. त्यातीलच दोन प्रमुख दावेदार आज आपल्या पहिल्या सामन्यात भिडत आहे. तब्बल १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आजच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजून गेला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून यजमान भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. लक्षणीय बाब म्हणजे शुबमन गिल आज अनुपस्थित असून इशान किशन सलामीवीर म्हणून खेळत आहे.
दरम्यान, शुबमन गिलच्या अनुपस्थितीमुळे इशान किशन सलामीवीर म्हणून खेळेल, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ -डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
वन डे विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू