ICC ODI World Cup 2023 IND vs AUS : टीम इंडिया आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ मधील आपल्या मोहिमेची सुरुवात रविवार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. सलामीवीर शुबमन गिल हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय राहिला आहे . मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिल डेंग्यूने ग्रस्त असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांत खेळणार नसल्याचे समजते. पण, कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) आता गिलच्या खेळण्याबाबत मोठे अपडेट दिले आहेत.
कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की,''सर्व खेळाडू आणि संघाचे वातावरण खूप चांगले आहे. आम्ही स्पर्धा सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. संघातील प्रत्येकजण तंदुरुस्त आहे आणि शुबमन गिल आजारी असल्याचे मान्य केले तरी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून तो अद्याप बाहेर पडलेला नाही.'' रिपोर्ट्सनुसार, गिलचे खेळणे खूपच अवघड दिसत आहे. अशाप्रकारे जर गिल खेळला नाही तर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन व रोहित डावाची सुरुवात करताना दिसू शकतील.
२०२३ च्या वर्ल्ड कपबाबत रोहित पुढे म्हणाला की,''आम्ही यापूर्वी काय केले आहे. काही फरक पडत नाही. आमच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करणे, येथील परिस्थितीचे आकलन करणे आमच्यासाठी खूप महत्वाचे असेल. कारण खेळपट्ट्या थोड्या कठीण असू शकतात. त्यामुळे खेळादरम्यान अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. मार्चमध्ये आम्ही ऑस्ट्रेलियाशी खेळलो आणि त्या सामन्यात आम्ही मागे राहिलो. पण आपल्यात कुठे कमीपणा होता हे आता कळतंय. आमच्या संघात जे काही सात ते आठ फलंदाज आहेत. ते सर्व गेममध्ये भिन्न शैली आणतात. त्यामुळे खेळाडूंनी अष्टपैलू असावे अशी माझी इच्छा आहे कारण या परिस्थितीत खेळण्यासाठी तुम्हाला खूप अनुभव हवा आहे. मला माझ्या खेळाडूंना स्वातंत्र्य द्यायचे आहे आणि प्रत्येकाचा संघाला पूर्ण पाठिंबा आहे.''
Web Title: ICC ODI World Cup 2023 IND vs AUS : Rohit Sharma said, "we'll give every chance to Shubman Gill to recover. He's still not ruled out".
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.