१ धाव होती तिथे ३ दिल्या! भारतीयांचे क्षेत्ररक्षण पाहून चाहत्यांना पाकिस्तान आठवला, video 

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) दुखापत ही भारतासाठी चिंतेची बाब बनली आहे..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:47 PM2023-10-19T16:47:32+5:302023-10-19T16:47:47+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : A comedy of errors, Indian player give easy 3 runs to Bangladesh, Video     | १ धाव होती तिथे ३ दिल्या! भारतीयांचे क्षेत्ररक्षण पाहून चाहत्यांना पाकिस्तान आठवला, video 

१ धाव होती तिथे ३ दिल्या! भारतीयांचे क्षेत्ररक्षण पाहून चाहत्यांना पाकिस्तान आठवला, video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) दुखापत ही भारतासाठी चिंतेची बाब बनली आहे.. बांगलादेशविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात ९व्या षटकात हार्दिकने दुखपतीमुळे मैदान सोडले. बांगलादेशच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिली होती, परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. पण, या सामन्यात एक मजेशीर प्रसंग पाहयाला मिळाला. जिथे एक धाव होती, तिथे भारतीय क्षेत्ररक्षकांनी बांगलादेशला ३ धावा दिल्या. 

मोठी बातमी : हार्दिक पांड्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, आजच्या सामन्यातून घ्यावी लागली माघार?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय तनझीद हसन व लिटन दास या सलामीवीरांनी योग्य ठरवताना ९३ धावांची भागीदारी केली. ही वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशच्या सलामीवीरांची २४ वर्षांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya Injury) दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले असून तो गोलंदाजी करणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. कुलदीप यादवने हसनला ( ५१ ) बाद केले. रवींद्र जडेजाने २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नजमूल होसैन शांतोला ( ८) पायचीत केले आणि बांगलादेशला ११० धावांवर दुसरा धक्का बसला.


२४व्या षटकात मोहम्मद सिराजने भारताला तिसरी विकेट मिळवून देताना मेहिदी हसन मिराजला ( ३) यष्टिरक्षक लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर जडेजाने सेट फलंदाज लिटन दासला चूक करण्यास भाग पाडले. ८२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६६ धावा करणारा दास झेलबाद झाला.  २०-३१ षटकांत बांगलादेशला ३९ धावाच करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. ३१व्या षटकात शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर मजेशीर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले..

Web Title: ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : A comedy of errors, Indian player give easy 3 runs to Bangladesh, Video    

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.