ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : दुखापतीतून सावरून जबरदस्त कमबॅक करणाऱ्या हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) पुन्हा एकदा दुखापत झाल्याचे दिसले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकचा पाय मुरगळला आणि ९व्या षटकात त्याचा पाय मुरगळला. तो वेदनेने विव्हळला आणि रोहित शर्मा त्वरित त्याच्याजवळ पळत गेला. फिजिओनेही मैदानावर धाव घेतली. अखेर हार्दिकने मैदान सोडले आणि ते षटक विराट कोहलीने पूर्ण केले. हार्दिकचे असे मैदानाबाहेर जाण्याने चाहत्यांचं टेंशन वाढले आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी भारतीय संघ पुण्यातील मैदानावर बांगलादेशचा सामना करण्यासाठी उतरला आहे. भारताने आतापर्यंत तिन्ही सामने जिंकले आहेत आणि तोच विजयी संघ कायम राखण्याचा निर्णय कर्णधार रोहित शर्माने घेतला आहे. बांगलादेशला मात्र प्रमुख खेळाडू व कर्णधार शाकिब अल हसन याच्याशिवाय आज खेळावे लागतेय. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितला प्रथम गोलंदाजीच करायची होती. तनझीद हसन आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली कामगिरी करताना अर्धशतकी भागीदारी केली आहे.
९व्या षटकात हार्दिक गोलंदाजीला आला अन् चौथा चेंडू टाकण्यापूर्वी त्याचा पाय मुरगळला.. तो खेळपट्टीवरच बसून राहिला आणि रोहित टेंशनमध्ये आला. हार्दिक हा भारताचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला दुखआपतीमुळे गमावणे टीम इंडियाला महागात पडू शकते. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला आहे. फलंदाजाने मारलेला चेंडू पायाने अडवण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला.
बांगलादेश संघ - लिटन दास, तनझीद हसन, नजमुल होसैन शांतो ( कर्णधार), मेहिदी हसन मिराझ, तोवहिद हृदॉय, मुश्फिकर रहिम, महमदुल्लाह, नसूम अहमद, हसन महमुद, मुस्ताफिजूर रहमान, शोरिफूल इस्लाम
भारत संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
Web Title: ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : Hardik Pandya has done his ankle, Pandya walks off the field. Virat Kohli to continue his over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.