IND vs BAN Live : हार्दिकला दुखापत, ७ वर्षानंतर विराटची गोलंदाजी; बांगलादेशच्या ओपनर्सने मोडला २४ वर्षांपूर्वीचा विक्रम

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय पहिल्या २० षटकांत तरी योग्य ठरल्याचे दिसतेय..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:44 PM2023-10-19T15:44:47+5:302023-10-19T15:45:29+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : Hardik Pandya injured, Virat kohli bowling after 7 years; Bangladesh openers broke the record of 24 years ago, BAN 110/2 (20), Video | IND vs BAN Live : हार्दिकला दुखापत, ७ वर्षानंतर विराटची गोलंदाजी; बांगलादेशच्या ओपनर्सने मोडला २४ वर्षांपूर्वीचा विक्रम

IND vs BAN Live : हार्दिकला दुखापत, ७ वर्षानंतर विराटची गोलंदाजी; बांगलादेशच्या ओपनर्सने मोडला २४ वर्षांपूर्वीचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय पहिल्या २० षटकांत तरी योग्य ठरल्याचे दिसतेय.. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने २० षटकांत २ बाद ११० धावा केल्या आहेत. बांगलादेशच्या ओपनर्सनी २४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून भारताची डोकेदुखी वाढवलीच होती, त्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya Injury) दुखापतीची भर पडली. विराट कोहलीने त्याचे षटक पूर्ण केले. 

IND vs BAN Live : हार्दिक पांड्याला दुखापत, वेदनेने हैराण; सोडले मैदान, विराट कोहलीनं पूर्ण केली ओव्हर

बांगलादेशच्या सलामीवीरांनी आश्चर्यचकित सुरुवात केली. तनझीद हसन आणि लिटन दास यांनी सलामीला येताना सुरुवातीची ५ षटकं संथ खेळ केला, परंतु सेट झाल्यावर त्यांनी हात मोकळे करण्यास सुरुवात केली. सामन्याच्या ७व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या यॉर्कर चेंडू तनझीदच्या पायावर जाऊन आदळला. भारतीय खेळाडूंनी DRS घेतला असता तर ही विकेट मिळाली असती. ही जोडी तोडण्यासाठी हार्दिक पांड्याला गोलंदाजीवर आणले, परंतु फलंदाजाने मारलेला चेंडू रोखण्यासाठी हार्दिकने पायाने प्रयत्न केला आणि त्याचा पाय मुरगळला. त्याला मैदान सोडावे लागल्याने भारताचे टेंशन वाढले. विराटने हे षटक पूर्ण केले आणि २०१५ ( वि. ऑस्ट्रेलिया) नंतर त्याने वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच गोलंदाजी केली. यापूर्वी २०११ मध्ये उपांत्यपूर्ण फेरी ( वि. ऑस्ट्रेलिया) व फायनल ( वि. श्रीलंका) त्याने गोलंदाजी केली होती. २०१७मध्ये त्याने वन डे क्रिकेटमध्ये शेवटची ( वि. श्रीलंका) शेवटची गोलंदाजी केली होती.  

१४ षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला अन् रोहितने प्रेरणादायी शब्दांनी संघात ऊर्जा भरली अन् पुढच्याच षटकात कुलदीप यादवने विकेट घेतली. हसन स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला. त्याने ४३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा चोपल्या. त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले.  हसन आणि दास यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशच्या सलामीवीरांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी १९९९ मध्ये मेहराब व शहरिरा यांनी पाकिस्तानविरुद्ध ६९ धावा जोडल्या होत्या.  भारताविरुद्धची वन डे क्रिकेटमधील बांगलादेशच्या सलामीवीरांची ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. हसन व दास यांनी २०१०मध्ये इम्रुल कायेस व तमिम इक्बाल यांचा ८० धावांचा विक्रम मोडला.  

रवींद्र जडेजाने २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नजमूल होसैन शांतोला ( ८) पायचीत केले आणि बांगलादेशला ११० धावांवर दुसरा धक्का बसला.  

Web Title: ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : Hardik Pandya injured, Virat kohli bowling after 7 years; Bangladesh openers broke the record of 24 years ago, BAN 110/2 (20), Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.