Join us  

अफलातून कॅचनंतर रंवीद्र जडेजाची 'गोल्ड मेडल'साठी मागणी; KL Rahul ही शर्यतीत; बघा Video  

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live :  हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे बाहेर जावे लागल्याची चिंता सोडल्यास भारतीय संघाने आज बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 6:16 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live :  हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे बाहेर जावे लागल्याची चिंता सोडल्यास भारतीय संघाने आज बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी केली. बांगलादेशच्या सलामीवीरांचा खेळ पाहून आज ते ३०० पार जातील असेच वाटले होते, परंतु गोलंदाजांचा अप्रतिम मारा, सुरेख क्षेत्ररक्षण अन् अफलातून झेल याच्या जोरावर भारताने कमबॅक केले. लोकेश राहुलरवींद्र जडेजा यांनी घेतलेले झेल चर्चेचा विषय ठरले. त्यात जडेजाने झेल घेतल्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला देण्यात येणारे गोल्ड मेडल मलाच मिळायला हवे असा इशारा फिल्डिंग कोचकडे केला.

बांगलादेशचे सलामवीर तनझीद हसन ( ५१) व लिटन दास ( ६६) यांनी ९३ धावांची भागीदारी केली. पण, कुलदीप यादवने पहिला धक्का दिल्यानंतर त्यांची गाडी घसरली. नजमूल होसैन शांतो ( ८), मेहिदी हसन मिराज ( ३) अपयशी ठरले. मुश्फिकर रहिम आणि तोवहीद हृदय ( १६) यांची ४२ धावांची भागीदारी तोडली. जसप्रीत  बुमराहला त्याच्या सातव्या षटकात पहिली विकेट मिळाली. रहिमचा ( ३८) अफलातून झेल जडेजाने टिपला. जडेजाने १०-०-३८-२ अशी स्पेल टाकली. कुलदीपनेही ४७ धावांत १ विकेट घेतली.

नसून अहमद ( १४) व महमदुल्लाह २५ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. महमदुल्लाहने  ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा करून बांगलादेशला ८ बाद २५६ धावांपर्यंत पोहोचवले. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर जडेजा म्हणाला, मी आमच्या फिल्डिंग कोचसाठी तसे सेलिब्रेशन केले. सर्वोत्तम फिल्डिंग करणाऱ्या मेडल दिले जाते आणि मी त्यांना सांगत होतो की मी आहे. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरवींद्र जडेजालोकेश राहुलभारत विरुद्ध बांगलादेश