Join us  

०.७८ सेकंद...! KL Rahul ने घेतला अफलातून झेल, मोहम्मद सिराजचा विकेटचा दुष्काळ संपला, Video 

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 5:12 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. सामन्यातील पहिल्या दहा षटकांत बांगलादेशच्या सलामीवीरांनी पकड घेतली होती, परंतु नंतर भारताने पुनरागमन केले. लोकेश राहुलने ( KL Rahul) एक अफलातून झेल घेऊन बांगलादेशला मोठा धक्का दिला. मोहम्मद सिराजला आज विकेटचा दुष्काळ संपवता आला. 

बांगलादेशच्या तनझीद हसन व लिटन दास या सलामीवीरांनी ९३ धावांची भागीदारी केली. ही वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशच्या सलामीवीरांची २४ वर्षांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya Injury) दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले असून तो गोलंदाजी करणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. कुलदीप यादवने पहिली विकेट मिळवून देताना हसनला ( ५१ ) बाद केले. रवींद्र जडेजाने २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नजमूल होसैन शांतोला ( ८) पायचीत केले.

२४व्या षटकात मोहम्मद सिराजने भारताला तिसरी विकेट मिळवून देताना मेहिदी हसन मिराजला ( ३) यष्टिरक्षक लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. लोकेशने अफलातून झेल घेतला. जडेजाने सेट फलंदाज लिटन दासला चूक करण्यास भाग पाडले. ८२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६६ धावा करणारा दास झेलबाद झाला.  २०-३१ षटकांत बांगलादेशला ३९ धावाच करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. अनुभवी मुश्फिकर रहिम आणि तोवहीद हृदय यांनी बांगलादेशचा डाव सावरताना पुन्हा सरासरी सुधारली होती. या दोघांची ४२ धावांची भागीदारी शार्दूलने ३८व्या षटकात हृदयला ( १६) माघारी पाठवून तोडली.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपलोकेश राहुलभारत विरुद्ध बांगलादेशमोहम्मद सिराज