Join us  

रोहित शर्माने पाडला विक्रमांचा पाऊस! यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये केल्यात सर्वाधिक धावा अन्... 

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि बांगलादेश यांच्यात काही तरी कनेक्शन आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 7:17 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि बांगलादेश यांच्यात काही तरी कनेक्शन आहे. म्हणूनच वर्ल्ड कप स्पर्धेत जेव्हा बांगलादेशचा संघ समोर असतो तेव्हा रोहितची बॅट वेगाने फटकेबाजी करते. २५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदैनावर उतरलेल्या रोहितने दोन चौकाराने सुरुवात केली आणि त्यानंतर खणखणीत षटकार खेचला. आशियाई खंडात त्याने वन डेतील ६००० धावा आज पूर्ण केल्या आणि अनेक मोठे विक्रम नावावर केले.  

बांगलादेशचे सलामवीर तनझीद हसन ( ५१) व लिटन दास ( ६६) यांनी ९३ धावांची भागीदारी केली. पण, कुलदीप यादवने पहिला धक्का दिल्यानंतर त्यांची गाडी घसरली. नजमूल होसैन शांतो ( ८), मेहिदी हसन मिराज ( ३) अपयशी ठरले. मुश्फिकर रहिम ( ३८) आणि तोवहीद हृदय ( १६) यांची ४२ धावांची भागीदारी तोडली. नसून अहमद ( १४) व महमदुल्लाह २५ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. महमदुल्लाहने  ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा करून बांगलादेशला ८ बाद २५६ धावांपर्यंत पोहोचवले प्रत्युत्तरात, रोहित शर्माने दोन चौकारांनी सुरुवात केली, तर शुबमन गिलनेही चौकाराने खाते उघडले. रोहित फटकेबाजीच्याच मुडमध्ये दिसला आणि त्याने पुलशॉटने मारलेला षटकार स्टेडियम दणाणून सोडण्यासाठी पुरेसा ठरला.  नसूम अहमदच्या फिरकीवर पहिल्याच षटकात गिल वाचला, पण रोहित कोणाला ऐकत नव्हता. वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक ७५०* धावांचा विक्रम आज रोहितने नावावर करताना शाकिब अल हसनचा ( ७४३) विक्रम मोडला.  वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंजादांमध्ये रोहितने १२२६* ( २१ इनिंग्ज) चौथे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( २२७८), रिकी पाँटिंग ( १७४३) आणि कुमार संगकारा ( १५३२) हे आघाडीवर आहेत. 

कॅलेंडर वर्षात ( २०२३) सर्वाधिक ६१ षटकार मारण्याचा विक्रमही रोहितने नावावर करताना इयॉन मॉर्गनचा ६० ( २०१९) षटकारांचा विक्रम मोडला.  भारताने ९ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेश