ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा धक्का बसला. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) बांगलादेशविरुद्धच्या लढतीत पहिल्याच षटकात दुखापत झाली. त्याला मैदान सोडावे लागले आणि आता हाती आलेल्या बातमीनुसार त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यात ना गोलंदाजी करू शकणार नसल्याचे BCCIच्या सूत्रांनी सांगितले. तो फलंदाजीला येईल का याबाबत स्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय पहिल्या २० षटकांत योग्य ठरवला. तनझीद हसन व लिटन दास या सलामीवीरांनी २४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. त्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya Injury) दुखापतीची भर पडली. विराट कोहलीने त्याचे षटक पूर्ण केले. कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून देताना हसनला बाद केले. त्याने ४३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा चोपल्या. हसन आणि दास यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशच्या सलामीवीरांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रवींद्र जडेजाने २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नजमूल होसैन शांतोला ( ८) पायचीत केले आणि बांगलादेशला ११० धावांवर दुसरा धक्का बसला.
२४व्या षटकात मोहम्मद सिराजने भारताला तिसरी विकेट मिळवून देताना मेहिदी हसन मिराजला ( ३) यष्टिरक्षक लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. हार्दिक पांड्याला स्कॅनसाठई नेण्यात आले आहे आणि त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळणार नाही. कदाचित तो पुढील सामन्यातही मुकण्याची शक्यता आहे.
Web Title: ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : Update - Hardik Pandya is being taken for scans and won't be available to bowl or field in this game, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.