Join us  

IND vs BAN : विराट कोहलीने शतकानंतर मागितली रवींद्र जडेजाची माफी; म्हणाला, जड्डूकडून ती गोष्ट चोरली...

ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी बांगलादेशवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:16 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी बांगलादेशवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले २५७ धावांचे लक्ष्य भारताने ४१.३ षटकांत पूर्ण केले. विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी करून प्लेअऱ ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला. या सामन्यानंतर विराटने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची जाहीर माफी मागितली. 

KL Rahul अन् अम्पायरची शतकासाठी मदत; विराट कोहली ७४ वर असताना भारताला हव्या होत्या २६ धावा अन्...

लिटन दास ( ६६), तनझीद हसन ( ५१), महमुदुल्लाह ( ४६) व मुश्फिकर रहिम ( ३८) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने ८ बाद २५६ धावा केल्या. लिटन दास व तनझीद यांनी ९३ धावांची सलामी दिली होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८८ धावांची भागीदारी केली. रोहित ४८ धावांवर, तर शुबमन ५३ धावांवर बाद झाला. विराटने ९७ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या. लोकेश राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला, तर श्रेयस अय्यर १९ धावांवर बाद झाला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला,'' जड्डूकडून तो (PoTM पुरस्कार) चोरल्याबद्दल क्षमस्व, मला मोठे योगदान द्यायचे होते. माझ्याकडे वर्ल्ड कप स्पर्धेतील काही अर्धशतके होती आणि मी खरोखर त्याचे शतकात रुपांतर करू शकलो नव्हतो. मला फक्त यावेळी खेळ संपवायचा होता आणि शेवटपर्यंत थांबायचे होते जे मी गेल्या काही वर्षांत केले आहे. पहिले चार चेंडू, दोन फ्री-हिट, एक षटकार आणि एक चौकार ही माझ्यासाठी स्वप्नवत सुरुवात होती.  खेळपट्टी खूपच चांगली होती आणि मला माझा खेळ खेळण्याची परवानगी दिली. टायमिंगवर फटके मारले, जोरात धावणे आणि आवश्यक तेव्हा चौकार मिळवणे, हे करायचे होते. ड्रेसिंग रूममध्ये एक छान वातावरण आहे, आम्ही एकमेकांच्या सहवासावर प्रेम करतो.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीभारत विरुद्ध बांगलादेशलोकेश राहुल