टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; 20 वर्षांनंतर दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने

ICC ODI World Cup 2023 :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 01:35 PM2023-11-19T13:35:26+5:302023-11-19T13:36:42+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup 2023 : India Vs Australia World Cup Final LIVE Score Update: Rohit Sharma Virat Kohli Mohammed Shami | Narendra Modi Stadium | टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; 20 वर्षांनंतर दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; 20 वर्षांनंतर दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 : जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना यजमान भारत आणि पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत दोन्ही संघ जेतेपदासाठी आमनेसामने आले आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून ो्िो्ेि निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ स्टेडियमवर पोहोचले आहेत.

दोन्ही संघ दुसऱ्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये आमने-सामने आले आहेत. 2003 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्यात कांगारुंनी 125 धावांनी भारतावर विजय मिळवला होता. आता भारताला वीस वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये हरवण्याची संधी आहे. 

भारत चौथ्यांदा तर ऑस्ट्रेलिया 8व्यांदा  फायनल खेळणार 
भारतीय संघ चौथ्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे. यापूर्वी भारताने 1983, 2003 आणि 2011 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ 8व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाने संघाने 7 पैकी 5 फायनल जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया गेल्या 27 वर्षांपासून वर्ल्ड कप फायनलमध्ये हरलेला नाही. संघाने गेल्या 24 वर्षांतील सर्व 4 फायनल जिंकल्या आहेत. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव 1996 मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाला होता.

प्लेइंग इलेवन
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅडम जम्पा आणि जोश हेजलवुड.

Web Title: ICC ODI World Cup 2023 : India Vs Australia World Cup Final LIVE Score Update: Rohit Sharma Virat Kohli Mohammed Shami | Narendra Modi Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.