ICC ODI World Cup 2023 : नवरात्रीमुळे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यातला सामना १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या २-३ देशांनी वेळापत्रकात काही बदल सुचवले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आयसीसी व बीसीसीआय हे सुधारित वेळापत्रक कधी जाहीर करतेय, याची उत्सुकता आहे. पण, आता हाती आलेल्या बातमीनुसार पाकिस्तानच्या तीन सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. असे असले तरी भारतात वर्ल्ड कप खेळायला जायचे की नाही, याबाबत पाकिस्तानचं अजून ठरत नाही.
आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार होती, परंतु बीसीसीआयने भारतीय संघाला न पाठवण्याचा निर्णय घेतला अन् ही स्पर्धा पाकिस्तान-श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागासाठी त्यांना पाकिस्तान सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानचा संघ शेवटचा भारतात आला होता. आता यायचं की नाही याचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे. या निर्णयासाठी ११ सदस्यीय समिती नेमण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.
पाकिस्तानचे सुधारित सामने
पाकिस्तान वि. नेदरलँड्स - ६ ऑक्टोबर, हैदराबाद
पाकिस्तान वि. श्रीलंका - १० ऑक्टोबर - हैदराबाद
पाकिस्तान वि. भारत- १४ ऑक्टोबर- अहमदाबाद
Web Title: ICC ODI World Cup 2023 Reschedule Matches - India vs Pakistan match on November 14th, but No confirmation on WC participation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.