SA vs AUS Live : क्विंटन डी कॉक ऑन फायर! सलग दुसरे शतक झळकावून मोडला १२ वर्षांपूर्वीचा विक्रम

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांनी दक्षिण आफ्रिकेला दमदार सुरूवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 04:37 PM2023-10-12T16:37:41+5:302023-10-12T16:38:13+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : Quinton de Kock ( 109) is setting the World Cup on fire, back to back hundred, break 12 years old record | SA vs AUS Live : क्विंटन डी कॉक ऑन फायर! सलग दुसरे शतक झळकावून मोडला १२ वर्षांपूर्वीचा विक्रम

SA vs AUS Live : क्विंटन डी कॉक ऑन फायर! सलग दुसरे शतक झळकावून मोडला १२ वर्षांपूर्वीचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांनी दक्षिण आफ्रिकेला दमदार सुरूवात करून दिली. १०८ धावांच्या भागीदारीने आफ्रिकेचा पाया मजबूत केला होता आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज विकेटसाठी चाचपडताना दिसले. त्यात बवुमाला दोन जीवदान मिळाले, परंतु अखेर ग्लेन मॅक्सवेलने हा अडथळा दूर केला. पण, क्विंटन डी कॉकने शतक झळकावून आफ्रिकेला मजबूत स्थितीत कायम ठेवले. त्याने षटकार खेचून सलग दुसरे शतक पूर्ण केले. ९० चेंडूंत ८ चौकार व ५ षटकाराच्या आतषबाजूने ऑस्ट्रेलियाला हतबल केले. 


भारताकडून पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आज लखनौ येथे दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी उतरला आहे. आफ्रिकेने त्यांच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ४२८ धावांचा डोंगर उभा करून विक्रमी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांनी सावध सुरूवात करताना पहिल्या १० षटकांत ५३ धावा केल्या. १३व्या षटकात अॅडम झम्पाच्या गोलंजाजीवर बवुमाचा ( १९) झेल यष्टिरक्षक जॉश इंग्लिसने टाकला. बवुमाने १६व्या षटकात मार्कस स्टॉयनिसचे चौकाराने स्वागत केले. तिसऱ्या चेंडूवर त्याचा पूल शॉट चुकला होता अन् ऑसी खेळाडूने सीमारेषेवर झेल घेतलाच होता. पण, तोल गेल्याने त्याने चेंडू मिचेल स्टार्कच्या दिशेने फेकला, परंतु चेंडू बराच लांब गेला अन् बवुमाला आणखी एक जीवदान मिळाले.  

Image
ग्लेन मॅक्सवेलने आफ्रिकेला १०८ धावांवर पहिला धक्का दिला. टेम्बा बवुमा ३५ धावांवर डेव्हिड वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. जोश हेझलवूडच्या चेंडूवर क्विंटनने खणखणीत स्कूप शॉट खेळून षटकार खेचला. क्विंटनने पाठोपाठ षटकार खेचले आणि त्याच्यासाथीला व्हॅन डेर ड्यूसेन आला. पण, झम्पाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ड्यूसेन २६ धावांवर झेलबाद झाला. ड्युसेनने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद २००० धावांच्या विक्रमात पाकिस्तानच्या इमाम-उल-हक ( ४६ इनिंग्ज) याला मागे टाकले. 


क्विंटनने ९० चेंडूंत शतक पूर्ण केले आणि वन डेत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या ओपनर्समध्ये तो ( १९) दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. हर्षल गिब्सचा ( १८) विक्रम त्याने मोडला आणि आता हाशिम आमलाचा ( २७) विक्रम त्याला खुणावतोय. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे त्याचे दुसरे शतक आहे आणि त्याने आमला, फॅफ ड्यू प्लेसिस, गिब्स यांच्याशी बरोबरी केली.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे त्याचे तिसरे शतक आहे आणि गिब्सच्या विक्रमाची येथेही त्याने बरोबरी केलीय. २०११ मध्ये एबीने सलग दोन शतक झळकावली होती आणि वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेच्या यष्टिरक्षकाच्या सर्वोत्तम १०७* धावांचा विक्रम एबीच्या नावाव होता, परंतु आज क्विंटनने १०८+ धावा करून हा विक्रम मोडला.  

Web Title: ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : Quinton de Kock ( 109) is setting the World Cup on fire, back to back hundred, break 12 years old record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.