SA vs AUS Live : दक्षिण आफ्रिकेचा दरारा! ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय अन् भारतासह तिघांना धक्का 

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : दक्षिण आफ्रिका वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या लढतीत सर्वच आघाड्यांवर ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:33 PM2023-10-12T21:33:40+5:302023-10-12T21:35:31+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : South Africa beat Australia by 134 runs, Climb to number one spot in Point Table   | SA vs AUS Live : दक्षिण आफ्रिकेचा दरारा! ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय अन् भारतासह तिघांना धक्का 

SA vs AUS Live : दक्षिण आफ्रिकेचा दरारा! ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय अन् भारतासह तिघांना धक्का 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : दक्षिण आफ्रिका वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या लढतीत सर्वच आघाड्यांवर ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात चूका करताना ४-५ झेल टाकले, तेच आफ्रिकेच्या खेळाडूंनी मिळालेली प्रत्येक संधी दोन्ही हातानी मजबूत पकडली. क्विंटन डी कॉकचे शतक अन् एडन मार्करमच्या दमदार खेळीनंतर आफ्रिकन गोलंदाजांनी कमाल केली. कागिसो रबाडाने त्याच्या पहिल्याच स्पेलमध्ये ३ मोठे धक्के दिले. मार्को यानसेन व लुंगी एनगिडी त्याच्या मदतीला होतेच. आफ्रिकेने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. 


मिचेल मार्श ( ७) आणि डेव्हिड वॉर्नर (१३) यांना अनुक्रमे मार्को यानसेन व लुंगी एनगिडीने बाद केले. कागिसो रबाडाने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ६-१-२२-३ अशी अप्रतिम गोलंदाजी केली. स्टीव्ह स्मिथ ( १९), जॉश इंग्लिस ( ५) आणि मार्कस स्टॉयनिस ( ५) या महत्त्वाच्या विकेट्स त्याने घेतल्या. स्मिथ व स्टॉयनिस यांच्यासाठी आफ्रिकेने DRS घेतला अन् दोन्ही यशस्वी ठरले. पण, ऑस्ट्रेलियन खेळाडू तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर नाराज दिसले. इंग्लिसचा उडवलेला त्रिफळा अविश्वसनीय होता. ग्लेन मॅक्सवेल ( ३) याला केशव महाराजने कॉट अँड बोल्ड केले.  मिचेल स्टार्क व लाबुशेन खेळपट्टीवर उभे राहिले खरे, परंतु ऑसींना २० षटकांत १८७ धावा करायच्या होत्या. 


 

स्टार्क आणि लाबुशेन यांनी सातव्या विकेटसाठी ९८ चेंडूंत ६९ धावांची भागीदारी केली होती. पण, यानसेन याने ३४व्या षटकात ही जोडी तोडली अन् स्टार्क २७ ( ५१) धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर महाराजने ऑसींचा सेट फलंदाज लाबुशेनला ( ४६) चूक करण्यास भाग पाडले. महाराजने १० षटकांत ३० धावा देताना २ विकेट्स घेतल्या. तब्रेझ शम्सीने त्याची पहिली विकेट घेताना पॅट कमिन्सला ( २२) बाद केले. पाठोपाठ जोश हेझलवूडला ( २) बाद करून शम्सीने ऑसींचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियााच संपूर्ण संघ ४०.५ षटकांत १७७ धावांवर माघारी परतला आणि दक्षिण आफ्रिकेने १३४ धावांनी विजय मिळवला.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने आज पुन्हा एकदा तीनशेपार मजल मारली. क्विंटन डी कॉकने ( १०९) सलग दुसरे शतक झळकावले आणि एडन मार्करमने ( ५६) पुन्हा एकदा वादळी खेळी केली. क्विंटन आणि बवुमा यांनी १०८ धावांची सलामी दिली. बवुमा ( ३५), व्हॅन डेर ड्यूसेन ( २६), हेनरिच क्लासेन ( २९) यांच्या योगदानानंतर मार्करमयाने अर्धशतक ठोकले. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मार्को यानसनने ( २६) अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून आफ्रिकेला  ७ बाद ३११ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: ICC ODI World Cup 2023 SA vs AUS Live : South Africa beat Australia by 134 runs, Climb to number one spot in Point Table  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.