बांगलादेशची घसरगुंडी, २८ धावांत ५ फलंदाज परतले माघारी; दक्षिण आफ्रिकेची डरकाळी, Video

ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : श्रीलंका (४२८), ऑस्ट्रेलिया ( ३११), इंग्लंड ( ३९९)  यांच्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 07:49 PM2023-10-24T19:49:42+5:302023-10-24T19:58:00+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : BAN 58/5 (15), Five down now for Bangladesh within 15 overs, Video  | बांगलादेशची घसरगुंडी, २८ धावांत ५ फलंदाज परतले माघारी; दक्षिण आफ्रिकेची डरकाळी, Video

बांगलादेशची घसरगुंडी, २८ धावांत ५ फलंदाज परतले माघारी; दक्षिण आफ्रिकेची डरकाळी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : श्रीलंका (४२८), ऑस्ट्रेलिया ( ३११), इंग्लंड ( ३९९)  यांच्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि ५ बाद ३८२ धावांचा डोंगर उभा केला. हे लक्ष्य बांगलादेशला पेलवणार नाही हे निश्चित होते, तरीही त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा होती. लिटन दास व तनझिद हसन यांनी सावध खेळ केला, परंतु बांगलादेशच्या फलंदाजांनी तंबूत जाण्याची घाई केली. 

Stats : दक्षिण आफ्रिकेचा विश्वविक्रम; क्विंटन डी कॉकनेही मोडला १६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड


वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock ) तिसऱ्या शतकाची नोंद केली, तर हेनरिच क्लासेन ( Heinrich Klaasen) याने पुन्हा वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. २ बाद ३५ वरून क्विंटन डी कॉक आणि एडन मार्कराम ( ६०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली.  डी कॉक आणि हेनरिच क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत १४२ धावा जोडल्या. डी कॉकने आज १४० चेंडूंत १५ चौकार व ७ षटकारांसह १७४ धावांची खेळी केली.  क्लासेन ४९ चेंडूंत २ चौकार व ८ षटकारांसह ९० धावांवर झेलबाद झाला.  त्याने मिलरसह २५ चेंडूंत ६५ धावा जोडल्या. मिलरच्या १५ चेंडूंतील ३४ धावांच्या जोरावर आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३८२ धावांपर्यंत नेले.  


तनझिद हसन आणि लिटन दास यांनी ६ षटकांत ३० धावा फलकावर चढवून सकारात्मकता दाखवली होती. पण, मार्को यान्सनने सलग दोन चेंडूंवर दोन धक्के देत बांगलादेशची गाडी रुळावरून खाली ढकलली. हसन ( १२ ) व नजूनल शांतो ( ०) दोघंही यष्टिरक्षक हेनरिच क्लासेनच्या हाती झेल देऊन माघारी परतले. क्लासेनचा आज झेल घेण्याचा सराव सुरू असल्याचे दिसले, कारण लिझाड विलियम्सने ८व्या षटकात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन ( १) यालाही झेलबाद केले. गेराल्ड कोएत्झीने बांगलादेशला चौथा धक्का दिला आणि मुश्फिकर ( ८) माघारी परतला. लिटन दास संयमाने खेळत होता, परंतु कागिसो रबाडाने त्याला ( २२ धावा) पायचीत केले आणि बांगलादेशचा निम्मा संघ ५८ धावांत तंबूत परतला. बिनबाद ३० वरून बांगलादेशचे ५ फलंदाज पुढील २८ धावांत तंबूत परतले.

Web Title: ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : BAN 58/5 (15), Five down now for Bangladesh within 15 overs, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.