ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत एकिकडे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान संघर्ष करताना दिसत असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा खेळ अनेकांच्या मनात धडकी भरवणारा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत ३५०+धावा म्हणजे आफ्रिकेच्या हातचं मळ झालेला दिसतोय. क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) आणि हेनरिच क्लासेन ( Heinrich Klaasen) यांच्या फटकेबाजीने आज पुन्हा वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. आजही बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजयाची नोंद करून गुणतालिकेत ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंडची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.
तनझिद हसन आणि लिटन दास यांनी ६ षटकांत ३० धावा फलकावर चढवून सकारात्मकता दाखवली होती. पण, मार्को यान्सनने सलग दोन चेंडूंवर हसन ( १२ ) व नजूनल शांतो ( ०) यांना यष्टिरक्षक हेनरिच क्लासेनच्या हाती झेल देऊन माघारी पाठवले. लिझाड विलियम्सने ८व्या षटकात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन ( १) या बाद केले. पाठोपाठ. गेराल्ड कोएत्झीने मुश्फिकर ( ८) आणि कागिसो रबाडाने त्याला ( २२ धावा) पायचीत केले आणि बांगलादेशचा निम्मा संघ ५८ धावांत तंबूत परतला. इथून बांगलादेशचे पुनरागमन अशक्यच होते, त्यात भर केशव महाराजने मेहिदी हसन मिराझला ( ११) बाद केले.
महमूदुल्लाह आणि नसूम अहमद यांनी सातव्या विकेटसाठी ३९ चेंडूंत ४१ धावा जोडून बांगलादेशला शतक पार पोहोचवले. कोएत्झीने ही जोडी तोडताना नसूमला ( १९) बाद केले. महमूदुल्लाहने ६८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विजय निश्चित नसला तरी संपूर्ण ५० षटकं खेळून काढण्याचा बांगलादेशचा प्रयत्न होता. महमूदुल्लाह आणि हसन महमूद ( १५) यांनी ३७ धावा जोडल्या अन् कागिसो रबाडाने ही जोडी तोडली. महमूदुल्लाहचा खेळ चांगलाच बहरलेला होता आणि त्याने १०३ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने मुस्ताफिजूर रहमानसह फिफ्टी + धावा जोडल्या. महमूदुल्लाह १११ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह १११ धावांवर झेलबाद झाला. बांगलादेशचा संपूर्ण संघ ४६.३ षटकांत २३३ धावांवर ऑल आऊट झाला आफ्रिकेने १४९ धावांनी विजय मिळवला.
बांगलादेशने आज २३५ धावांपर्यंत मजल मारली असती तर त्यांचा नेट रन रेट हा इंग्लंडपेक्षा चांगला राहिला असता, परंतु ते २३३ धावांवर ऑल आऊट झाले. या दोन धावांमुळे त्यांचा नेर रन रेट -१.२५३ असा झाला आणि त्यांना १०व्या क्रमांंकावर घसरावे लागले. इंग्लंड -१.२४८ नेट रन रेटसह नवव्या क्रमांकावर आले.
तत्पूर्वी, २ बाद ३५ वरून क्विंटन डी कॉक आणि एडन मार्कराम ( ६०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. डी कॉक आणि हेनरिच क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत १४२ धावा जोडल्या. डी कॉकने आज १४० चेंडूंत १५ चौकार व ७ षटकारांसह १७४ धावांची खेळी केली. क्लासेन ४९ चेंडूंत २ चौकार व ८ षटकारांसह ९० धावांवर झेलबाद झाला. त्याने मिलरसह २५ चेंडूंत ६५ धावा जोडल्या. मिलरच्या १५ चेंडूंतील ३४ धावांच्या जोरावर आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३८२ धावांपर्यंत नेले.
Web Title: ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : South Africa have defeated Bangladesh by 149 runs, MAHMUDULLAH 111 (111) with 11 fours and 4 sixes, changes in Point Table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.