Join us  

वर्ल्ड कप वेळापत्रकात आणखी बदल? पाकिस्तानच्या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास पोलिसांचा नकार!

ICC ODI World Cup 2023 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, तरीही वेळापत्रक निश्चित होताना दिसत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 4:16 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, तरीही वेळापत्रक निश्चित होताना दिसत नाही. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील १० शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने होणार आहेत. पण, आता त्यात आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचे ICC व BCCI ने जाहीर केले होते. पण, नवरात्रीमुळे या सामन्याला सुरक्षा पुरविणे अवघड असल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगितले गेले अन् ही मॅच एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबरला खेळवण्याचे ठरले आहे. त्यामुळे सुधारित वेळापत्रक आज किंवा उद्या जाहीर होईल, अशी अपेक्षा असताना आणखी एक समस्या समोर आली आहे

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ( CAB) ने बीसीसीआयला इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला १२ नोव्हेंबरला कोलकाताच्या इडन गार्डनवर होणाऱ्या लढत दुसरीकडे खेळवण्याची विनंती केली आहे. ११ नोव्हेंबर ही पर्यायी तारीख त्यांनी सूचवली आहे. १२ नोव्हेंबरला कोलकाता येथे काली पूजेचा महोत्सव आहे आणि त्यामुळे शहर पोलिसांनी PAK vs ENG सामन्याला सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे. CAB आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी बैठक पार पडली आणि त्यात सुरक्षा व कायद्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे CAB ने बीसीसीआय सचिव जय शाह यांना पत्र लिहून पाकिस्तान वि. इंग्लंड लढतीची तारीख बदलण्याची विनंती केली आहे. 

इडन गार्डनवर बांगलादेश वि. नेदरलँड्स ( २८ ऑक्टोबर), बांगलादेश वि. पाकिस्तान ( ३१ ऑक्टोबर), भारत वि. दक्षिण आफ्रिका ( ५ नोव्हेंबर), इंग्लंड वि. पाकिस्तान ( १२ नोव्हेंबर) आणि दुसरी सेमी फायनल ( १६ नोव्हेंबर) अशा पाच लढती होणार आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या लढतीने ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानकोलकाता दक्षिणइंग्लंड
Open in App