चेन्नई : आज वन डे विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर भिडणार आहे. ही स्पर्धा भारतात होत असल्याने विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाकडे पाहिले जात आहे. मात्र, पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारताला मोठा झटका बसल्याचे दिसते. कारण सलामीवीर शुबमन गिल टीम इंडियासोबत स्टेडियममध्ये जाताना दिसला नाही. गिल आजारी असल्यामुळे आजच्या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन गिल डेंग्यूने ग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांत खेळणार नसल्याचे समजते.
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वन डे विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू