भारताचे दोन्ही सराव सामने रद्द; जाणून घ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचे संपूर्ण वेळापत्रक

ICC ODI World Cup 2023 Team India schedule: भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सराव करण्याची संधी मिळाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:19 PM2023-10-03T17:19:05+5:302023-10-03T17:22:52+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup 2023 Team India schedule: Full Squad, list of matches, dates, venues, timings, live streming  | भारताचे दोन्ही सराव सामने रद्द; जाणून घ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचे संपूर्ण वेळापत्रक

भारताचे दोन्ही सराव सामने रद्द; जाणून घ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचे संपूर्ण वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 Team India schedule: भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सराव करण्याची संधी मिळाली नाही. भारताचे दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द झाले. आता भारतीय संघ थेट रविवारी ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर उतरणार आहे.  त्यानंतर अफगाणिस्तान व नंतर पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला होणार आहे. भारतीय संघाने नुकताच आशिया चषक उंचावला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. त्यामुळे भारताकडून अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.


भारताला २०१३ नंतर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०११ मध्ये भारताने शेवटचा वन डे वर्ल्ड कप उंचावला होता आणि तोही घरच्या मैदानावर... आता १२ वर्षांनी पुन्हा घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकण्याची भारताला संधी आहे. शुबमन गिल व रोहित शर्मा ही भारताची सलामीची जोडी असणार आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल हे फॉर्मात आहेत आणि त्यांच्यामुळे मधली फळी भक्कम झाली आहे. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर ही अष्टपैलू खेळाडूंची फौज भारताच्या संघात आहे. आर अश्विन याची सरप्राईज एन्ट्री झाली.

अक्षर पटेलला दुखापत झाल्याने अश्विनला बोलावण्यात आले आणि आता त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कुलदीप यादव त्याच्या मदतीला आहेच. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हा जलद मारा आहेच. इशान किशन व सूर्यकुमार यादव सारखे तगडे खेळाडू बॅकअपला आहेत. 

वर्ल्ड कप साठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

भारताचे सामने ( दुपारी - २ वाजल्यापासून) 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू 

थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, हॉट स्टार डिस्नीवर फ्री 

Web Title: ICC ODI World Cup 2023 Team India schedule: Full Squad, list of matches, dates, venues, timings, live streming 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.