सराव सामन्यात भारताने टॉस जिंकला; यजमानांसमोर इंग्लंडचं आव्हान, टीम इंडिया १५ खेळाडूंसह मैदानात

ICC ODI world cup 2023 warm match, IND vs ENG : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:40 PM2023-09-30T13:40:44+5:302023-09-30T13:41:04+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI world cup 2023 warm match India have won the toss and they've decided to bat first | सराव सामन्यात भारताने टॉस जिंकला; यजमानांसमोर इंग्लंडचं आव्हान, टीम इंडिया १५ खेळाडूंसह मैदानात

सराव सामन्यात भारताने टॉस जिंकला; यजमानांसमोर इंग्लंडचं आव्हान, टीम इंडिया १५ खेळाडूंसह मैदानात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुवाहाटी : भारतीय संघ आजपासून आपल्या विश्वचषकातील अभियानाची सुरूवात करत आहे. आज भारत आणि गतविजेत्या इंग्लंड यांच्यात सराव सामना खेळवला जात आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून इंग्लिश संघाला प्रथम गोलंदाजी करण्यास सांगितले आहे. भारतीय संघ १५ खेळाडूंसह मैदानात उतरणार असून विश्वचषकाचा सराव करेल. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या सराव सामन्यात दोन्हीही संघ आपल्या १५ सदस्यीय विश्वचषकाच्या संघातील कोणत्याही खेळाडूला आजमावू शकतात.

वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

विश्वचषकातील भारताचे सामने -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू 
 

Web Title: ICC ODI world cup 2023 warm match India have won the toss and they've decided to bat first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.