७ बळी गमावूनही ग्लेन मॅक्सवलने मानली नाही हार; अफगाणिस्तानवर शतकी प्रहार!

ICC ODI World Cup AFG vs AUS Live : पाच वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानने रडवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:07 PM2023-11-07T21:07:47+5:302023-11-07T21:08:01+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup AFG vs AUS Live :  HUNDRED FOR GLENN MAXWELL, team was down & out with 91 for 7 and then he smashed hundred from just 76 balls, Video | ७ बळी गमावूनही ग्लेन मॅक्सवलने मानली नाही हार; अफगाणिस्तानवर शतकी प्रहार!

७ बळी गमावूनही ग्लेन मॅक्सवलने मानली नाही हार; अफगाणिस्तानवर शतकी प्रहार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup AFG vs AUS Live : पाच वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानने रडवले. विजयासाठी २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाद ९१ धावांत तंबूत परतले. पण,  ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) एकटा लढला. त्याने कर्णधार पॅट कमिन्सला सोबतीला घेताना शतकी भागीदारीच्या दिशेने वाटचाल केली आणि त्यात कमिन्सचे ८ धावांचे योगदान राहिले. मॅक्सवलेने ७६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाला अजूनही १०६ चेंडूंत १०६ धावा हव्या आहेत. 

अफगाणिस्तानच्या कामगिरीमुळे पाकिस्तान, न्यूझीलंड 'गॅस'वर; उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात


वेगवान गोलंदाज नवीन उल हकने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ट्रॅव्हीस हेड ( ०) व मिचेल मार्शला ( २४) माघारी पाठवून कागारूंवर दडपण आणले. त्याचा फायदा अन्य गोलंदाजांना झाला आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज बॅकफूटवर गेले. अझमतुल्लाह ओमारजाईने सलग दोन चेंडूंवर ऑसींना मोठे धक्के दिले. डेव्हिड वॉर्नरचा ( १८) त्रिफळा उडवल्यानंतर जॉश इंग्लिसला त्याने भोपळ्यावर माघारी पाठवले. या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या १० षटकांत ४ फलंदाज गमावण्याची ही पाचवी वेळ ठरली. श्रीलंकेचे ६ फलंदाज १४ धावांवर भारताविरुद्ध मुंबईतच माघारी परतले होते. 


मार्नस लाबुशेन काही काळ खेळपट्टीवर उभा राहिला, पंरतु स्वतःच्याच चुकीमुळे रन आऊट होऊन १४ धावांवर माघारी पाठवला. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १४.१ षटकांत ६९ धावांवर तंबूत परतला. जलदगती गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर फिरकीपटूंची वेळ आली आणि राशीद खानने ऑसींना सहावा धक्का देताना मार्कस स्टॉयनिसला ( ६) बाद केले. राशीदने आणखी एक धक्का देताना मिचेल स्टार्कला ( ३) गुंडाळले. ऑस्ट्रेलियाने कशीबशी शंभरी पार केली, परंतु त्यांचा पराभव अटळ होता. नूर अहमदने टाकलेल्या २२व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला तीन जीवदान मिळाले.

Web Title: ICC ODI World Cup AFG vs AUS Live :  HUNDRED FOR GLENN MAXWELL, team was down & out with 91 for 7 and then he smashed hundred from just 76 balls, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.