Join us  

हा 'नवीन' अफगाणिस्तान! ४९ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदात तंबूत, वॉर्नर क्लिन बोल्ड, Video 

ICC ODI World Cup AFG vs AUS Live : मुंबईच्या वानखेडेवर २०१७मध्ये न्यूझीलंडने भारताविरुद्ध ४ बाद २८४ धावा करून सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 7:15 PM

Open in App

ICC ODI World Cup AFG vs AUS Live : मुंबईच्या वानखेडेवर २०१७मध्ये न्यूझीलंडने भारताविरुद्ध ४ बाद २८४ धावा करून सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग केला होता. आज ऑस्ट्रेलिया हा विक्रम मोडतील का? याची उत्सुकता होती. अफगाणिस्तनची यंदाच्या स्पर्धेतील धक्कादायक कामगिरी हाही सामन्यात सुरूच राहिली. ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज ४९ धावांत त्यांनी माघारी पाठवले. नवीन उल हकने सुरुवातीला दोन धक्के दिल्यानंतर अझमतुल्लाह ओमरजाईने सलग दोन विकेट्स घेतल्या. त्याची हॅटट्रीक हुकली, परंतु ऑस्ट्रेलिया आता पूर्णपणे दबावाखाली गेलीय. 

Boommm...! 'गोफण' फिरवतात तशी राशीदने बॅट फिरवली अन् षटकार; स्टार्क गपगार, Video 

अफगाणिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालासाठी सज्ज झाले आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि इब्राहिम झाद्रानने शतकी खेळी करून तो सार्थ ठरवला. पण, खरा कहर राशीद खानने ( Rashid Khan ) केला. अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्या आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध उभी केली. अफगाणिस्तानने ५ बाद २९१ धावा उभ्या केल्या. राशीदने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावा चोपल्या. झाद्रान १४३ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह १२९ धावांवर नाबाद राहिला. यापूर्वी २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी सर्वबाद २८८ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने शेवटच्या १० षटकांत ९२ धावा चोपल्या आणि वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील ही त्यांची शेवटच्या १० षटकांतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.  

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच षटकात धक्का बसला.. नवीन उल हकने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला भोपळ्यावर माघारी पाठवले. डेव्हिड वॉर्नरचा झेल अफगाणिस्तानच्या खेळाडूने सोडला, परंतु नवीनच्या पुढच्या षटकात मिचेल मार्श ( २४) पायचीत होऊन माघारी परतला. अफगाणिस्तानचे गोलंदाज टिच्चून मारा करताना दिसले. वॉर्नरकडून आशा होती, परंतु अझमतुल्लाहने अप्रतिम चेंडूवर त्याचा ( १८) त्रिफळा उडवला अन् पुढच्याच चेंडूवर जॉश इंग्लिसला माघारी पाठवले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाअफगाणिस्तानडेव्हिड वॉर्नर