ICC ODI World Cup AFG vs AUS Live : इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका या तुलनेने तगड्या संघांना पराभवाची चव चाखवल्यानंतर अफगाणिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालासाठी सज्ज झाले आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि इब्राहिम झाद्रानने शतकी खेळी करून तो सार्थ ठरवला. पण, खरा कहर राशीद खानने ( Rashid Khan ) केला. त्याने झाद्रानसह अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यात मिचेल स्टार्कने टाकलेले ५० वे षटक अविस्मरणीय ठरले. या दोघांनी २७ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली.
इब्राहिम झाद्रान बरसला! काल सचिनकडून टिप्स, आज त्याचाच १९९६चा विक्रम मोडला
अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्या आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध उभी केली. अफगाणिस्तानने ५ बाद २९१ धावा उभ्या केल्या. राशीदने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावा चोपल्या. झाद्रान १४३ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह १२९ धावांवर नाबाद राहिला. यापूर्वी २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी सर्वबाद २८८ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने शेवटच्या १० षटकांत ९२ धावा चोपल्या आणि वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील ही त्यांची शेवटच्या १० षटकांतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
यापैकी राशीद व झाद्रान यांनी शेवटच्या ६ षटकांत ७५ धावा कुटल्या. मिचेल स्टार्कने शेवटचं षटक टाकलं अन् राशीदने ४,०,६,०,६,० असे फटके मारले. स्टार्कने पाचवा चेंडू स्लोव्हर बाऊन्सर टाकला अन् राशीदने गोफण फिरवतात तशी बॅट फिरवली अन् स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लॅट सिक्स खेचला.
Web Title: ICC ODI World Cup AFG vs AUS Live : Rashid Khan smashed incredible six to Mitchell Starc ball, another flat-batted forehand swat, and this flies into the stands at square leg, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.