Join us  

शर्यत संपलेली नाही, कारण अजून आम्ही..., सेमीफायनलबाबत बाबर आजम प्रचंड आशावादी

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 3:51 PM

Open in App

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहेत. त्यांना उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर किमान २८८ धावांनी इंग्लंडवर विजय मिळवावा लागेल. पण, ते होणे शक्य दिसत नाही. तरीही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम हा प्रचंड आशावादी आहे. आमची एक मॅच शिल्लक आहे आणि आम्ही नेट रन रेटचा अभ्यास केला आहे असा दावा बाबरने केला आहे. 

भारत ( १६ गुण), दक्षिण आफ्रिका ( १२) व ऑस्ट्रेलिया ( १२) यांनी उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली आहे. चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलंड जवळपास पक्के आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत आणि ते त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकून न्यूझीलंडशी ( १०) बरोबरी करू शकतील. पण, नेट रन रेटच्या जोरावर त्यांना मागे सोडणे पाकिस्तान व अफगाणिस्तान दोघांनाही शक्य नाही. न्यूझीलंड ०.७४३ अशा नेट रन रेटसह आघाडीवर आहेत. 

पाकिस्तानचे उपांत्य फेरीसाठीचे गणितप्रथम फलंदाजी केल्यास- ३०० धावा केल्यास इंग्लंडला १३ धावांवर गुंडाळावे लागेल- २८७ धावांनी विजय आवश्यक - ३५० धावा केल्यास इंग्लंडला ६३ धावांवर गुंडाळावे लागेल- २८७ धावांनी विजय आवश्यक - ४०० धावा केल्यास इंग्लंडला ११२ धावांवर गुंडाळावे लागेल- २८८ धावांनी विजय आवश्यक     प्रथम गोलंदाजी आल्यास- इंग्लंडने ठेवलेले लक्ष्य ३ षटकांत पार करावे लागेल.  

बाबर आजम म्हणाला, आम्ही इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नेट रन रेटचा अभ्यास केलेला आहे. पण, याचा अर्थ आम्ही पहिल्या चेंडूपासून डोळे बंद करून फटकेबाजी करणार नाही. आम्हाला फटकेबाजी हवी आहे, परंतु पॉवरप्लेमध्ये दमदार खेळ करून भागीदारी रचण्याचा आमचा प्रयत्न असेल. 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या कर्णधारपदाबाबत चर्चा करेल आणि पाकिस्तानात गेल्यानंतर याबाबत निर्णय होईल. सध्यातरी माझे पूर्ण लक्ष हे अखेरच्या साखळी सामन्यावर आहे, असेही बाबर म्हणाला. तो पुढे म्हणाला, भारतात आम्हाला खूप प्रेम मिळाले. मी कधीच वैयक्तिक अर्धशतकासाठी खेळलो नाही. अनेकांनी माझ्या संथ स्ट्राईक रेटवर टीका केली, परंतु मला परिस्थिती महत्त्वाची आहे. मी नेहमी टीमचा विचार करतो.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपबाबर आजमपाकिस्तानइंग्लंड