Join us  

ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक; ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रेकॉर्ड ब्रेकिंग आतषबाजी, किवींसमोर तगडं आव्हान

ICC ODI World Cup AUS vs NZ Live :  डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी आज धर्मशालाच्या मैदानावर वादळ आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 2:08 PM

Open in App

ICC ODI World Cup AUS vs NZ Live :  डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी आज धर्मशालाच्या मैदानावर वादळ आणले. ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ११७ चेंडूंत १७५ धावा चोपून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना हतबल केले. वॉर्नरचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सातवे शतक थोडक्यात हुकले, परंतु हेडने ५९ चेंडूत शतक ठोकले. या दोघांच्या विकेटनंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. ग्लेन फिलिप्स ( ३-३७), ट्रेंट बोल्ट ( ३-७७) आणि मिचेल सँटनर ( २-८०) यांनी धक्के दिले. न्यूझीलंडकडून आज क्षेत्ररक्षणात बऱ्याच चुका झाल्या. जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल व पॅट कमिन्स यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून संघाला चारशे धावांच्या नजीक पोहोचवले. 

फ्लावर नहीं फायर है! ट्रॅव्हिस हेडने ५९ चेंडूंत शतक ठोकले, वॉर्नरच्या फटकेबाजीने स्टेडियम दणाणले

हेडचा खेळ पाहून तो दुखापतीतून सावरून पुनरागमन करतोय असे वाटलेच नाही. या दोघांच्या फटकेबाजीने किवी गोलंदाजांना हतबल केले.  स्वप्नवत वाटचालीला २०व्या षटकात ब्रेक लागला. ग्लेन फिलिप्सने किवींना पहिली विकेट मिळवून दिली. वॉर्नर ६५ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ८१ धावांवर कॉट अँड बोल्ड झाला. वॉर्नर व हेड यांची ११७ चेंडूंतील १७५ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सलामीवारांकडून आज चौथ्या सर्वोत्तम भागीदारीची नोंद झाली. वॉर्नर व मिचेल मार्श यांनी याच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध २५९ धावांची ओपनिंग भागीदारी केली होती. वॉर्नर व हेड यांनी आज १७५ धावा जोडून २००७च्या फायनलमध्ये अॅडम गिलख्रिस्ट व मॅथ्यू हेडन ( १७२ धावा वि. श्रीलंका) यांचा विक्रम मोडला. 

हेडने ५९ चेंडूंत वर्ल्ड कप पदार्पणातील शतक झळकावले. वर्ल्ड कप पदार्पणात शतक झळकावणारा हेड पाचवा ऑसी फलंदाज ठरला. ट्रेव्हर चॅपेल ( १९८३), जॉफ मार्श ( १९८७), अँड्य्रू सायमं ( २००३) व आरोन फिंच ( २०१५) यांनी अशी कामगिरी केली आहे. फिलिप्सने न्यूझीलंडला मोठी विकेट मिळवून देताना हेडचा त्रिफळा उडवला. हेड ६७ चेंडूंत १० चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १०९ धावा करून माघारी परतला. फिलिप्सने आणखी एक विकेट घेताना स्टीव्ह स्मिथला ( १८) माघारी पाठवले. सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर ऑसींच्या धावा मंदावल्या. २३ षटकांत ऑसींनी २०० धावा केल्या होत्या, परंतु नंतरच्या १३ षटकांत त्यांना केवळ ६० धावा करता आल्या. त्यात मिचेल सँटनरने ऑसींच्या मिचेल मार्श ( ३६) आणि मार्नस लाबुशेन ( १८) यांना माघारी पाठवले.  

ग्लेन मॅक्सवेल व जोश इंग्लिस यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. दोघांची ३८ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी जिमी निशॅमने तोडली. ४५व्या षटकात निशॅमला बोलवण्यात आले आणि त्याने त्याच्या पहिल्याच षटकात मॅक्सवेलला माघारी पाठवले. तो २४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकांसह ४१ धावांवर झेलबाद झाला. इंग्लिस ( ३८) व पॅट कमिन्स ( ३७ धावा, १४ चेंडू ) यांच्या फटकेबाजीने किवींना पुन्हा हतबल केले. या दोघांनी २२ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.२ षटकां त३८९ धावांवर ऑल आऊट झाले. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियान्यूझीलंड