ICC ODI World Cup AUS vs NZ Live : डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी आज धर्मशालाच्या मैदानावर वादळ आणले. वॉर्नरने ६५ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ८१ धावा, तर हेडने ६७ चेंडूंत १० चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ११७ चेंडूंत १७५ धावा चोपून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना हतबल केले. या दोघांच्या विकेटनंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले होते. मिचेल सँटनरने ऑसींच्या मिचेल मार्श ( ३६) आणि मार्नस लाबुशेन ( १८) यांना माघारी पाठवले. पण, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल व पॅट कमिन्स यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली.
मॅक्सवेलने २४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकांसह ४१ धावा चोपल्या. इंग्लिस ( ३८) व पॅट कमिन्स ( ३७ धावा, १४ चेंडू ) यांच्या फटकेबाजीने किवींना पुन्हा हतबल केले. या दोघांनी २२ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. ग्लेन फिलिप्स ( ३-३७), ट्रेंट बोल्ट ( ३-७७) आणि मिचेल सँटनर ( २-८०) यांनी धक्के दिले. न्यूझीलंडकडून आज क्षेत्ररक्षणात बऱ्याच चुका झाल्या. ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत सर्वबाद ३८९ धावा केल्या. वन डे इतिहासात सलग तीन सामन्यांत ( ३६७/९ वि. पाकिस्तान, ३९९/८ वि. नेदरलँड्स ) ३५०+धावा करणारा पहिला संघ ठरला.
वर्ल्ड कप स्पर्धेत एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विक्रमात ऑस्ट्रेलिया आज दुसऱ्या क्रमांकावर आली. इंग्लंडने २०१९मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध २५ षटकार खेचले होते. ऑस्ट्रेलियाने आज २० षटकार खेचून २०१५ मध्ये वेस्ट इंडिजचा ( १९) झिम्बाब्वेविरुद्धचा विक्रम मोडला. वन डे क्रिकेटमध्ये ऑल आऊट होऊन ३८८ ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. वेस्ट इंडिजने २०१९मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८९ धावा केल्या होत्या.
Web Title: ICC ODI World Cup AUS vs NZ Live : In ODIs, Australia become the first team to post 350+ total in three consecutive innings.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.