मिचेल स्टार्कचा 'स्पार्क'! अविश्वसनीय झेल पाहून सारे झाले अवाक् किवींना मोठा धक्का , Video 

ICC ODI World Cup AUS vs NZ Live : न्यूझीलंडकडून क्षेत्ररक्षणात ढिसाळ कारभार पाहायला मिळाला, तेच ऑस्ट्रेलियाने अफलातून झेल घेत धक्के दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 03:50 PM2023-10-28T15:50:08+5:302023-10-28T15:51:02+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup AUS vs NZ Live :  Josh Hazlewood ends Devon Conway's day after a terrific diving catch from Mitchell Starc, NZ 100/2 (13.4), Video  | मिचेल स्टार्कचा 'स्पार्क'! अविश्वसनीय झेल पाहून सारे झाले अवाक् किवींना मोठा धक्का , Video 

मिचेल स्टार्कचा 'स्पार्क'! अविश्वसनीय झेल पाहून सारे झाले अवाक् किवींना मोठा धक्का , Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup AUS vs NZ Live : न्यूझीलंडकडून क्षेत्ररक्षणात ढिसाळ कारभार पाहायला मिळाला, तेच ऑस्ट्रेलियाने अफलातून झेल घेत धक्के दिले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला. किंवींकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचा त्यांनी पूरेपुर फायदा उचलला. त्याचवेळी न्यूझीलंडनेही प्रत्युत्तर दिले, पण ऑसींची फिल्डींग अफलातून होती. त्यात मिचेल स्टार्कने घेतलेला कॅच अविश्वसनीय ठरला. 

वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची ऐतिहासिक कामगिरी! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ


डेव्हिड वॉर्नर ( ८१) व ट्रॅव्हिस हेड ( १०९) यांनी  धर्मशालाच्या मैदानावर वादळ आणले आणि पहिल्या विकेटसाठी ११७ चेंडूंत १७५ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या विकेटनंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले होते.  मिचेल सँटनरने ऑसींच्या मिचेल मार्श ( ३६) आणि मार्नस लाबुशेन ( १८) यांना माघारी पाठवले.  पण, जोश इंग्लिस ( ३८) , ग्लेन मॅक्सवेल ( ४१) व पॅट कमिन्स ( ३७) यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. कमिन्स व इंग्लिस यांनी २२ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत सर्वबाद ३८९ धावा केल्या. ग्लेन फिलिप्स ( ३-३७), ट्रेंट बोल्ट ( ३-७७) आणि मिचेल सँटनर ( २-८०) यांनी धक्के दिले.  


न्यूझीलंडकडून तोडीततोड उत्तर पाहायला मिळाले. डेव्हॉन कॉनवे व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकांत ६१ धावा चोपल्या होत्या. पण, जोश हेझलवूडची लेग स्टम्पवर टाकलेली लेंथ डिलिव्हरीवर कॉनवेने फटका मारला अन् शॉर्ट फाईन लेगला उभ्या असलेल्या मिचेल स्टार्कने हवेत झेप घेत अविश्वसनीय झेल घेतला. कॉनवे १७ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावांवर बाद झाला.  हेझलवूडने त्याच्या पुढच्या षटकात विल यंगला ( ३२) बाद केले आणि याहीवेळेस स्टार्कने स्लीपमध्ये झेल घेतला. न्यूझीलंडने १० षटकांत ७३ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले. 

Web Title: ICC ODI World Cup AUS vs NZ Live :  Josh Hazlewood ends Devon Conway's day after a terrific diving catch from Mitchell Starc, NZ 100/2 (13.4), Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.