ICC ODI World Cup AUS vs NZ Live : आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाची दादागिरी पुन्हा परतल्याची पाहायला मिळतेय. आज तर त्यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना बेक्कार चोप दिला. डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी आज धर्मशालाच्या मैदानावर वादळ आणले. ट्रॅव्हिस हेडने ५९ चेंडूंत १०० पूर्ण केले.
डेव्हिड वॉर्नर-ट्रॅव्हिस हेड यांची तुफान फटकेबाजी; १ धावेने हुकला ऑसींचा वर्ल्ड रेकॉर्ड, विराटचा....
हेडचा खेळ पाहून तो दुखापतीतून सावरून पुनरागमन करतोय असे वाटलेच नाही. त्याने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने पहिल्या ५ षटकांत ६० धावा कुटल्या आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील ही तिसरी सर्वोत्तम खेळी ठरली. वॉर्नर-हेड जोडीने पहिल्या दहा षटकांत ११८ धावा कुटल्या, परंतु १ धावेने त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड हुकला. वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजने २००३ मध्ये कॅनडाविरुद्ध पहिल्या १० षटकांत १ बाद ११९ धावा केल्या होत्या.
या दोघांच्या फटकेबाजीने किवी गोलंदाजांना हतबल केले. किवींनी फिरकी गोलंदाजांना आणले, परंतु त्याचा फार उपयोग झाला नाही. या दोघांना रोखणं आज कोणालाच शक्य नव्हतं. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक षटकाराचा विक्रमात वॉर्नरने ( १९*) आज रोहित शर्माला ( १७) मागे टाकले. १९९९नंतर वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या १० षटकांत सर्वाधिक १० षटकारांचा विक्रमही आज ऑसींनी नावावर केला. श्रीलंकेने याच वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ षटकार खेचले होते. ऑस्ट्रेलियाची ही स्वप्नवत वाटचालीला २०व्या षटकात ब्रेक लागला.