ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : ऑस्ट्रेलियाला आयसीसी स्पर्धांचा 'दादा' का म्हटले जाते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ऑस्ट्रेलियाची वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात काही खास झाली नव्हती, परंतु त्यांनी मुसंडी मारली. उपांत्य फेरीच्या सामन्यात मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी पहिल्या १३ षटकांत दक्षिण आफ्रिकेला ४ धक्के दिले. टेम्बा बवुमा ( ०) पुन्हा फेल गेला आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज क्विंटन डी कॉक ( ३) दडपणाचा बळी ठरला. एडन मार्करम ( १०) आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ६) यांनाही मोठी खेळी आज करू दिली नाही. १४ षटकांत ४ बाद ४४ धावा असताना कोलकातात पाऊस सुरू झाला आणि मॅच थांबली होती.
वर्ल्ड कप, पाऊस आणि दक्षिण आफ्रिका
- १९९२ - उपांत्य फेरीच्या सामना पावसामुळे बाधित इंग्लंडकडून हार
२००३ - डकवर्थ लुईस नियमानुसार अशक्य आव्हान, श्रीलंकेकडून हार आणि सुपर सिक्समध्येही पात्र ठरले नाही
- २०१५ - इडन पार्कवरील लढतीत पावसामुळे बाधित सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव
डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासेन यांनी आफ्रिकेचा डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ही जोडी ऑसींच्या प्रमुख गोलंदाजांना दाद देत नव्हती, पण विकेट ट्रॅव्हिस हेडने मिळवून दिली. क्लासेन ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावांवर बाद झाला आणि मिलरसह त्याची ९५ धावांची ( ११३ चेंडू) भागीदारी संपुष्टात आली. पाठोपाठ त्याने मार्को यान्सेनलाही ( ०) माघारी पाठवून आफ्रिकेला सहावा धक्का दिला.